Join us  

बॅण्ड बाजा बारात! आलिया भट कधी घेणार रणबीर कपूरसोबत सात फेरे?, अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2020 10:39 AM

गेल्या २ वर्षांपासून आलिया भट आणि रणबीर कपूर एकमेकांना डेट करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे नाते आता कुणापासूनही लपून नाही. आलिया आणि रणबीर दोन वर्षांहून अधिक काळापासून एकमेकांसोबत आहेत. या नात्याविषयी आलियाने अनेकदा खुलासा केला आहे. पण, रणबीर कपूर तिच्यासोबतच्या या प्रेमाच्या नात्याविषयी पहिल्यांदा तेव्हा बोलला होता, जेव्हा त्यांच्या प्रेमाचा अकुंर नुकतेच बहरू लागला होता. गेल्या २ वर्षापासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा बऱ्याचदा ऐकायला मिळत असते. मात्र आता आलिया भट्टने तिला एवढ्यात लग्न करायचे नाही असे सांगितले आहे.

लग्नाच्या चर्चेवर आलिया भट सांगते की, ‘मी आत्ता फक्त २५ वर्षांची आहे त्यामुळे मला एवढ्या लवकर लग्न करायचे नाही.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत आलियाने सांगितले, मला सगळेच जण विचारत असतात की आम्ही लग्न कधी करणार? पण मी आत्ता फक्त २५ वर्षांची आहे. एवढ्या लहान वयात लग्न करणे म्हणजे खूप घाई होईल. मला एवढ्यात लग्न करायचे नाही. सध्या मी माझ्या करिअरवर फोकस करत आहे.’ तर दुसरीकडे रणबीर कपूरचे म्हणणे आहे की 'मी २०२१ मध्ये लग्न करणार.' 

रणबीर कपूर आणि आलिया भट लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात झळकणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमात रणबीर व आलिया यांच्याशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, डिंपल कपाडिया आणि मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.या शिवाय आलिया भट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटातही दिसणार आहे.

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरअमिताभ बच्चन