Join us  

Videos : ‘आनंदी’ बडी हो गई! 'बालिका वधू' फेम अविका गौरच्या हॉट अदांवर फॅन्स फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 6:08 PM

मालदीवच्या निळ्याशार समुद्राकाठचे अनेक व्हिडीओ अविकाने शेअर केले आहेत...

ठळक मुद्दे काही वर्षांपूर्वी  अविका गौर  आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंघन  यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या.

‘बालिका वधू’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचली छोटी आनंदी अर्थात अविका गौरच्या फोटोंनी सध्या इंटरनेटचा पारा वाढवला आहे. होय, अविका सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेन्ड मिलिंद चंदवानीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. आता मालदीवमध्ये सुट्टी म्हटल्यावर फोटोही आलेच. अविकाने मालदीवच्या निळ्याशार समुद्राकाठचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. तिच्या या बिकिनी फोटोंची सध्या जोरदार चर्चा आहे.

बॉलिवूड व छोट्या पडद्यावरचे अनेक सेलिब्रिटी सध्या मालदीवमध्ये आहेत. आता या यादीत अविकाचेही नाव सामील झालेय.कधी समुद्रकिना-यावरच्या लांटांसोबत मौजमस्ती करताना तर कधी वाळूवर निवांत वेळ घालवताना ती यात दिसतेय. तिचे हे फोटो व व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहेत. यावरच्या कमेंट्स तर विचारू नका. काहींनी अविकाचा हा बोल्ड अंदाज आवडला असून काहींनी मात्र हे फोटो पाहून अविकाला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे. 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अलीकडे अविका काही म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती.  बालिका वधू  मालिकेत अविका गौर हिने लहानग्या आनंदीची भूमिका साकारली होती. त्यानंतर  ससुराल सिमर का या मालिकेतही ती सहाय्यक भूमिकेत झळकली. याशिवाय, तिने काही तेलुगू आणि कन्नड चित्रपटांतही काम केलं आहे.

मात्र करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर,  फॅट टू फिट  चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले होते.  काही वर्षांपूर्वी  अविका गौर  आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंघन  यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. अगदी अविका मनिष रायसिंघनच्या मुलाची आई होणार, अशी अफवाही पसरली होती.  

टॅग्स :अविका गौर