Join us

बालदिनी लाँच होणार ‘दंगल’चे फर्स्ट साँग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2016 14:08 IST

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याला ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते ते काही उगाच नाही. चित्रपटांमधील त्याची व्यक्तीरेखा उत्कृष्ट असावी ...

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान याला ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखले जाते ते काही उगाच नाही. चित्रपटांमधील त्याची व्यक्तीरेखा उत्कृष्ट असावी म्हणून तो प्रचंड मेहनत घेत असतो. आगामी चित्रपट ‘दंगल’साठी त्याने त्याचे वजन वाढवले होते, हे आपल्याला ठाऊक आहेच. आता त्याने चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आणली आहे. ‘१४ नोव्हेंबर-बालदिन’ या दिवशी तो ‘दंगल’मधील पहिले गाणे रिलीज करणार आहे. मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेले ‘बापू तू सेहत के लिए हानीकारक हैं’ हे गाणे छोट्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरेल.गीतकार अमिताभ भट्टाचार्य आणि संगीतकार प्रितम यांच्या या गाण्यातून मुलांनी त्यांच्या वडिलांना हे सांगितलेय की,‘बाबा, तुम्ही आमच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. तुम्ही खुप जास्त प्रमाणात कडक आहात.’ हे गाणे लुधियाना येथे चित्रीत करण्यात आले आहे. आमिरच्या आॅनस्क्रीन मुली गीता आणि बबिता म्हणजेच जायरा वाशिम आणि सुहभटनागर यांच्या उपस्थितीत गाण्याचे लाँचिंग करण्यात येईल. आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा ‘बी टाऊन’ मध्ये सुरू आहे. २९ मिलीयन प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आहे. ट्रेलर लाँच होऊन केवळ १ महिना उलटून गेला असला तरीही ३० मिलीयन चाहत्यांनी हा ट्रेलर पाहिलाय. आमिर खान, किरण राव आणि सिद्धार्थ रॉय कपूर निर्मित आणि नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपट ‘दंगल’ केव्हा रिलीज होतोय अशी उत्सुकता सर्वांना लागली आहे.