Join us

दिलवाले वर भारी पडला बाजीराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:08 IST

६३ टक्के प्रेक्षकांनी 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर सिंगच्या परफॉर्मन्सला जबरदस्त सांगत शाहरुखच्या अभिनयात काहीच नवीन नसल्याचे सांगितले. चित्रपटप्रेमी सूरज सांकला ...

६३ टक्के प्रेक्षकांनी 'बाजीराव मस्तानी'मधील रणवीर सिंगच्या परफॉर्मन्सला जबरदस्त सांगत शाहरुखच्या अभिनयात काहीच नवीन नसल्याचे सांगितले. चित्रपटप्रेमी सूरज सांकला याने सांगितले की, 'रणवीरचे बोलणे, चालणे, बसण्याचा अंदाज जबरदस्त आहे. त्याने पेशव्याची भूमिकाही अतिशय नॅचरलपणे साकारली आहे. त्यामुळे त्याला बॉलिवूडचा भावी सुपरस्टार म्हणायला हरकत नाही.' 'दिलवाले'बाबत २२ टक्के चित्रपटप्रेमी निराश असल्याचे आढळून आले. असे असतानाही ३३ टक्के चित्रपटप्रेमींनी मात्र शाहरुखच्या अभिनयाला दाद दिली. ५५ टक्के प्रेक्षकांनी शाहरूख आणि रणवीर दोघांनाही पसंती दर्शवित त्यांनी त्याची भूमिका अतिशय चोखपणे पार पाडल्याचे सांगितले. बाजी 'बाजीराव'च्याच हातीसीएनएक्सने शहरातील तब्बल एक हजार अशा चित्रपटप्रेमींशी चर्चा केली ज्यांनी दोन्ही चित्रपट बघितले. त्यामध्ये ६१ टक्के प्रेक्षकांनी 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट अप्रतिम असल्याचे सांगितले तर ४२ टक्के प्रेक्षक म्हणाले की, जर संधी मिळाली तर पुन्हा एकदा ते बाजीराव मस्तानी पहायला नक्की जातील. 'दिलवाले' बघितलेल्या ३९ टक्के प्रेक्षकांनी या चित्रपटाला अप्रतिम अशी पसंती दर्शविली आहे. तर ३६ टक्के प्रेक्षकांना हा चित्रपट पुन्हा बघण्याची इच्छा असल्याचे आढळून आले आहे.रोहितच्या तुलनेत भंसाळींचे पारडे जडजेव्हा चित्रपटप्रेमींना डायरेक्शनबाबत विचारले तेव्हांही 'बाजीराव मस्तानी'च दोन पावले पुढे असल्याचे स्पष्ट झाले. ६६ टक्के प्रेक्षकांनी संजयलीला भंसाळी यांच्या डायरेक्शनला दाद दिली. त्यांनी बाजीराव-मस्तानी यांच्या प्रेमकथेला पडद्यावर अतिशय सुरेखपणे दाखविल्याचे सांगितले. ३४ प्रेक्षकांनी रोहित शेट्टी याच्या कार रेसिंग, अँक्शन, कॉमेडी याचेही कौतुक केले. संजय लीला भंसाळी यांचा बाजीराव 'मस्तानी' तर रोहित शेट्टी यांचा 'दिलवाले' गेल्या आठवड्यात एकाच दिवशी प्रदर्शित झाले. हे दोन्ही सिनेमे तुल्यबळ असल्याने कोण बाजी मारेल असा प्रश्न चित्रपटप्रेमींच्या मनात निर्माण झाला होता. म्हणूनच या दोन्ही चित्रपटांबाबत उत्सुकता होती. १८ डिसेंबर रोजी दोन्ही चित्रपट पडद्यावर आले आणि त्यांच्या यशापयशाबाबत सोशल मीडियावर चांगलीच चर्चाही रंगली. काहींनी शाहरुख-काजोलच्या जोडीला पूर्ण मार्क देत 'दिलवाले' अप्रतिम असल्याचे सांगितले तर काहींनी रणवीर सिंग-दीपिका यांची केमिस्ट्री 'माईंड ब्लोईंग' असल्याचा दावा केला. जबरदस्त ओपनिंगसह 'दिलवाले'ने पहिल्याच दिवशी माहोल केला. मात्र जेव्हा चित्रपटांचे रिव्यूज समोर आले तेव्हा बाजीराव मस्तानी देखील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट झाले. याच विषयावर सीएनएक्सने प्रेक्षकांसोबत थेट चर्चा करीत कोणता चित्रपट जास्त चालतोय याचा आढावा घेतला. तेव्हा 'बाजीराव मस्तानी'ची ऐतिहासिक प्रेमकथा 'दिलवाले'वर भारी पडत असल्याचे स्पष्ट झाले. अभिनयाबाबत विचारले असता रणवीर सिंग शाहरुखपेक्षाही सरस वाटल्याचे प्रेक्षकांनी सांगितले.