'बाजीराव' साकारणे मोठेच चॅलेंज होते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 07:19 IST
एंटरटेनमेंट आणि लाईफ स्टाईल सारख्या विषयाला वाहिलेला सीएनएक्स पाहून रणवीरला आनंद झाला. सीएनएक्सची प्रशंसा करीत तो म्हणाला, हा प्रशंसनीय ...
'बाजीराव' साकारणे मोठेच चॅलेंज होते!
एंटरटेनमेंट आणि लाईफ स्टाईल सारख्या विषयाला वाहिलेला सीएनएक्स पाहून रणवीरला आनंद झाला. सीएनएक्सची प्रशंसा करीत तो म्हणाला, हा प्रशंसनीय उपक्रम आहे. सिनेमात काय चालले आहे याची लोकांना यातून चांगली माहिती मिळते. अमेरिके तून डिग्री मिळवून आल्यानंतर भारतात चांगल्या पॅकेजची नोकरी शोधता शोधता अचानक रणवीर सिंग नावाच्या युवकाला बॉलिवूडवे वेध लागले आणि चित्रपटाशी कोणताही संबध नसलेल्या या मनमौजी युवकाला बँड बाजा बारातची ऑफर मिळाली. आपल्या पहिल्याच चित्रपटात त्याने आपल्या खास अभिनयाची छाप सोडली. दीपिका पदुकोणसोबतच्या 'रामलीला' या चित्रपटामुळे तर तो तरुणाईच्या गळयातील ताईत झाला. तो सर्वांना हवाहवासा वाटायला लागला. आता तो पुन्हा परततोय. संजय लीला भंसाळी यांच्या भव्य दिव्य 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटात रणवीर सिंग, दीपिका पदुकोण व प्रियंका चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नागपुरात लोकमततर्फे आयोजित आंतरराज्यीय धमाल दांडिया स्पर्धेसाठी आलेल्या रणवीर सिंगने सीएनएक्सशी बाजीराव मस्तानीच्या 'लव्ह स्टोरी'बाबत दिलखुलास चर्चा केली. बाजीरावची भूमिका करण्यासाठी केलेला प्रयोग हा त्याच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा क्षण होता आणि ही भूमिका साकारणे मोठे चॅलेंज होते, हे त्याने आवर्जुन सांगितले.