Join us

bahubali-2 trailer : केवळ अदभूत! डोळे दिपवून टाकणारा प्रोमो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 10:46 IST

ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेर तो क्षण आला. होय, ‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’चा ट्रेलर कधी एकदा येतो, असे सगळ्यांना झाले होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

ज्या क्षणाची आपण सगळेजण आतुरतेने प्रतीक्षा करत होतो, अखेर तो क्षण आला.  होय, ‘बाहुबली2’ अर्थात ‘बाहुबली : दी कन्क्लुजन’चा ट्रेलर कधी एकदा येतो, असे सगळ्यांना झाले होते. अखेर आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.  डोळे दिपवून टाकणारे ‘बाहुबली2’चा भव्यदिव्य सेट, बाहुबलीची एकापेक्षा एक सरस अ‍ॅक्शन दृश्यांची झलक तुम्हाला या ट्रेलरमध्ये दिसेल.  जेव्हापासून  ‘बाहुबली2’ची रिलीज डेट जाहिर झालीय, तेव्हापासून बॉक्सआॅफिसवर खळबळ माजली आहे. या चित्रपटाचे थिएटर राईट्स अव्वाच्या सव्वा किंमत देऊन खरेदी केले गेले आहेत. केरळमध्ये १०़५० कोटी, तामिळनाडूत ४५ कोटी तर आंध्र व तेलंगणात सुमारे १०० कोटींना हे अधिकार विकले जाणार आहेत.  ‘बाहुबली2’च्या हिंदी व्हर्जनचे अधिकार १२० कोटी रुपए मोजून खरेदी करण्यात आले आहेत. म्हणजेच काय तर रिलीजपूर्वी चित्रपटाने ३५० कोटी रुपए कमावले आहेत.   काही दिवसांपूर्वी  ‘बाहुबली2’चे मोशन पोस्टर आऊट झाले होते. विशेष म्हणजे, रिलीज होताच या मोशन पोस्टरवर प्रेक्षकांच्या अक्षरश: उड्या पडल्या होत्या. हे मोशल पोस्टर यु ट्यूबवर पाचव्या क्रमांकावर ट्रेंड करत होते. कालच दिग्दर्शक एस एस राजामौली यांनी  ‘बाहुबली2’चे नवे पोस्टर रिलीज केले. या पोस्टरचे दोन भाग असून, वरच्या भागात कटप्पा अमेरेंद्र बाहुबलीला हातात घेऊन खेळवताना दिसत आहे, तर खालच्या भागात कटप्पा बाहुबलीला तलवारने मारताना दिसत आहे.   २०१५ मध्ये आलेल्या   ‘बाहुबली’ने धुमाकूळ घालत बॉक्स आॅफिसवर रेकॉर्डब्रेक  १०० कोटीहून अधिकची कमाई केली होती.  ‘बाहुबली: दी बिगीनिंग’मध्ये मुख्य भूमिका साकारणारा  प्रभास असो वा खलनायकाची भूमिका साकारणारा राणा डग्गुबती, या सगळ्यांनीच या चित्रपटाद्वारे अपार लोकप्रीयता मिळवली. आता प्रभाव व राणाला   ‘बाहुबली2’मध्ये पाहण्यास लोक उत्सूक आहेत.