Join us  

​‘बादशाहो’चे चौथे पोस्टर आऊट; पाहा, विद्युत जामवालचा ‘इंटेन्स लूक’!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 6:16 AM

अजय देवगणचा ‘बादशाहो’ हा अ‍ॅक्शनपट येतोय, हे आता कुणाला सांगायलाच नको. कारण अजय एका पाठोपाठ एक असे ‘बादशाहो’चे पोस्टर्स ...

अजय देवगणचा ‘बादशाहो’ हा अ‍ॅक्शनपट येतोय, हे आता कुणाला सांगायलाच नको. कारण अजय एका पाठोपाठ एक असे ‘बादशाहो’चे पोस्टर्स रिलीज करत सुटलाय. गेल्या तीन दिवसांत त्याने या चित्रपटाचे तीन पोस्टर रिलीज केलेत. पहिल्या पोस्टरमध्ये एक सोने लादलेला ट्रक दिसला होता. दुसºया पोस्टरमध्ये अजय देवगण दिसला होता. तोंडाला बांधलेला रूमाल, लेदर जॅकेट आणि हातात बंदूक असा यात अजयचा अवतार होता. तिस-या पोस्टरमध्ये इमरान हाश्मी दिसला होता. आता चौथ्या पोस्टरमध्ये विद्युत जामवाल याला एका इंटेन्स लूकमध्ये सादर केले गेले आहे. या चित्रपटात सहा वेगवेगळी पात्र असतील. जी सोने लादलेल्या ट्रकची सुरक्षा करताना दिसतील किंवा कदाचित त्या सोन्याची चोरी करताना दिसतील. कारण अद्याप या चित्रपटाची संपूर्ण कथा समोर आलेली नाही. कदाचित त्यासाठी आपल्याला ‘बादशाहो’च्या ट्रेलरची प्रतीक्षा करावी लागेल. जुलैमध्ये या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज होणार आहे.ALSO READ : अजय देवगणने शेअर केला काजोल व न्यासाचा ‘स्विमसूट’ लूक!चित्रपटाची कथा आणीबाणीच्यादरम्यानची आहे. रजत अरोराने चित्रपटाची कथा लिहिली आहे. चित्रपटात अजय देवगन, इलियाना डिक्रूज, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल यांच्या मुख्य भूमिका आहेत. सनी लिओनीचे स्पेशल डान्स नंबर या चित्रपटात आहे. अंकित तिवारीने या चित्रपटाचे संगीत दिले आहे. बादशाहो’चे दिग्दर्शन मिलन लूथरिया करतोय.   अजय आणि मिलन या जोडीने याआधी ही बरेच हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. ‘कच्चे धागे’, ‘चोरी चोरी’ आणि ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ सारखे चित्रपट या जोडीने एकत्र केले आहेत. हा यांच्या जोडीचा चौथा चित्रपट आहे. याआधी अजय देवन ‘शिवाय’मध्ये दिसला होता. मात्र या चित्रपटाला म्हणावे तसे यश  मिळवता आले नव्हते.