Join us  

OMG! जॅकलिन फर्नांडिसच्या या गाण्यावर चोरीचा आरोप, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 6:38 PM

जॅकलिनच्या नुकतेच लाँच झालेल्या गाण्यावर करण्यात आला चोरीचा आरोप

रॅपर बादशाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांचे नवीन गाणं गेंदा फूल नुकतंच रिलीज झाले आहे. हा म्युझिक अल्बमला चाहत्यांची दाद मिळत आहे. इतकंच नाही तर हा व्हिडिओ ट्रेंड करतो आहे. या गाण्यात पंजाबी रॅप आणि बंगाली फ्युजन आहे. रिलीजनंतर काही दिवसानंतर या गाण्यावर चोरीचा आरोप करण्यात आला आहे. या गाण्याचे बोल बंगाली गाणे बोरो लोकेर बेटी लोशी मिळतेजुळते आहे. आरोप आहे की गाण्याचे मूळ लेखक रतन कहार यांना क्रेडीट दिले नाही. या गाण्यावरील वाढता वाद पाहून बादशाहने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून याबाबतचा खुलासा केला आहे.

बादशाहने लिहिले की, सर्वात आधी त्या सर्वांचा आभारी आहे ज्यांना गेंदा फूल गाणे आवडले. विशेष करून जगातील बंगाली लोकांनी या गाण्याची प्रशंसा केली आहे. त्यामुळे हे गाणं वर्ल्डवाइड टॉप ट्रेंडिंगमध्ये आले आहे. 26 मार्चला हे गाणं रिलीज झाले आहे जे हिंदीत आहे.सोबतच बंगाली फोक लिरिक्स आहे.

गाणे रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर मला एक मेसेज मिळाला की गाण्याचे बोल मूळ बंगाली गाणे बोरो लोकेर बेटी लोमधून घेण्यात आले आहेत. जे दिग्गज कलाकार रतन कहार यांनी  लिहिले आहेत. परंतु आम्ही यावर खूप मेहनत घेतली आहे. मी असं मानतो की आपली संस्कृती, भाषा व संगीत यापेक्षा चांगलं काहीच नाही. एक कलाकार म्हणून माझा प्रयत्न असतो की आपल्या संगीताच्या माध्यमातून भारताशी निगडीत गोष्टी जगाला दाखवू शकेन.

बादशाह पुढे म्हणाला की, बंगाली समुदायाकडून मला याबद्दल समजले. मी त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा खूप प्रयत्न केला. पण लॉकडाउनमुळे शक्य झाले नाही. रतन कहार यांच्या गावापर्यंत पोहचणे आता कठीण आहे. माझी विनंती आहे की ते किंवा त्यांच्याकडून दुसरे कोणी माझ्यासोबत संपर्क करेल तर मी रतन कहार यांच्याशी बोलू शकेन. मला जितके शक्य होईल ते मी करेन. चाहते व जे हे गाणे ऐकत आहेत त्यांना आवाहन करतो की ते ही गोष्ट समजतील की ट्रेडिशनल म्युझिक जगभरात पोहचवण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे.

टॅग्स :जॅकलिन फर्नांडिसबादशहा