बॉक्स आॅफिसवर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ची गाडी सुसाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2017 19:58 IST
अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर सुसाट गाडी धावत असल्याचे दिसत ...
बॉक्स आॅफिसवर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ची गाडी सुसाट
अभिनेत्री आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाची बॉक्स आॅफिसवर सुसाट गाडी धावत असल्याचे दिसत आहे. तिसºया शुक्रवारीही चित्रपटाची घोडदौड सुरूच होती. कारण या दिवशी जवळपास १.३५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला होता. त्यामुळे हा चित्रपट शंभर कोटींच्या क्लबमध्ये विराजमान झाला असून, आतापर्यंत १०२. ०९ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. त्याचबरोबर शंभर कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळवणारा हा चित्रपट २०१७ मधील चौथा ठरला आहे. या अगोदर ‘रईस’, ‘काबिल’ आणि ‘जॉली एल.एल.बी.२’ या चित्रपटांनी यावर्षात शंभर कोटींपेक्षा अधिक कमाई केली. बॉलिवूड चित्रपट क्रिटीक तरन आदर्श यांच्यानुसार हा चित्रपट ११५ कोटी रुपयांच्या कमाईपर्यंत मजल मारू शकतो. आता हे बघणे मजेशीर ठरेल की, या वीकेंडपर्यंत हा चित्रपट किती कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकेल. वरुण आणि आलियाने एकत्र काम केलेला हा तिसरा चित्रपट आहे. या अगोदर या दोघांनी ‘स्टूडेंट आॅफ द इयर’ आणि ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरले आहेत, परंतु शंभर कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविलेला हा त्यांचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. }}}} दरम्यान, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट ‘दुल्हनिया’ सीरीजचा दुसरा भाग असून, शशांक खैतान यांनी तो दिग्दर्शित केला आहे. तर करण जोहर याच्या धर्मा प्रॉडक्शन हाउसअंतर्गत चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट हिट झाल्याने वरुण आणि आलिया यंग जनरेशनची हिट जोडी ठरली आहे, तर दुसरीकडे रणवीर आणि दीपिका या यंग जोडीच्या ‘पद्मावती’ या चित्रपटांकडे आता सगळ्यांच्या नजरा असतील.