Join us  

कथा चोरल्याच्या आरोपानंतर ‘बधाई हो’ला आणखी एक दणका!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 11:39 AM

कथा चोरल्याच्या आरोपानंतर ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या मेकर्सला आणखी एक दणका बसला आहे. होय, दिल्ली सरकारच्या राज्य तंबाखू नियंत्रण सेलने ‘बधाई हो’च्या निर्माता, दिर्ग्शक व अभिनेत्यांना नोटीस जारी केले आहे. 

कथा चोरल्याच्या आरोपानंतर ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या मेकर्सला आणखी एक दणका बसला आहे. होय, दिल्ली सरकारच्या राज्य तंबाखू नियंत्रण सेलने ‘बधाई हो’च्या निर्माता, दिर्ग्शक व अभिनेत्यांना नोटीस जारी केले आहे. या नोटीसमध्ये निर्माता व दिग्दर्शकास चित्रपटातील धुम्रपानाची दृश्ये गाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. असे न केल्यास कोटपाअंतर्गत (सिगरेट अ‍ॅण्ड अदर टोबॅको प्रॉडक्ट अ‍ॅक्ट) कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.सेलचे प्रभारी व आरोग्य सेवा संचालनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. एस के अरोरा यांनी सांगितले की, बॉलिवूडच्या अनेक चित्रपटाचा कोटपा कायद्याचे उल्लंघन होते. ‘बधाई हो’ या चित्रपटातील कलाकारांना अनेकदा धुम्रपान करताना दाखवण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटात सिगारेटच्या एका दुकानाचेही दृश्य आहे. येथे कलाकार एकत्र येत धुम्रपान करतात. यातील एका दृश्यातून विदेशी ब्रँडच्या एका सिगारेटचा प्रचार-प्रसार केल्याचेही अरोरा यांनी म्हटले आहे. चित्रपटातील अशा दृश्यांमुळे युवा वर्ग प्रभावित होतो. धुम्रपान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळते. देशात कर्करोग, मधुमेह, रक्तदाब यासारखे आजार वाढत आहे. या व टीबी सारख्या आजारांचे कारण तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आहे, असेही त्यांनी म्हटले.यापूर्वी ‘बधाई हो’च्या मेकर्सवर कथा चोरल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. छत्तीसगडचे लेखक व पत्रकार परितोष चक्रवर्ती यांनी ‘बधाई हो’चे निर्माता, दिग्दर्शक व लेखकावर कथा चोरल्याचा आरोप करत रायपूरच्या पंडारी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. 19 वर्षांपूर्वी आलेल्या ‘घर बुनते हुए’ या आपल्या पुस्तकातील ‘जड’ नामक कथा चोरून हा चित्रपट बनवण्यात आल्याचा आरोप परितोष यांनी केला आहे. सन 1998 मध्ये ‘जड’ नामक कथेचा आनंद बाजार पत्रिका ग्रुपशी संबंधित सुनंदा आणि कादम्बिनी या हिंदी साप्ताहिकाने बांगला भाषेत अनुवाद केला होता. ‘बधाई हो’ची कथा माझ्या याच कथेची हुबेहुब नक्कल करून बनवली आहे, असा दावाही परितोष यांनी केला आहे. या चित्रपटात आयुष्यमान खुराणाशिवाय नीना गुप्ता, सान्या मल्होत्रा आदी प्रमुख भूमिकेत आहेत.

टॅग्स :बधाई होआयुषमान खुराणा