Join us  

विश्वास बसणार नाही; पण ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने एका सीनसाठी घेतले ३७ रिटेक!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:00 AM

‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर सिनेमांत शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आहे.

ठळक मुद्दे‘सुपर डिलक्स’ या तामिळ चित्रपटात रम्या लीला नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’ या ब्लॉकबस्टर सिनेमांत शिवगामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, ‘सुपर डीलक्स’ या आगामी चित्रपटात रम्या पोर्न स्टारची भूमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच त्यागराजन कुमारराज दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. सध्या या ट्रेलरने सोशल मीडियावर धूम केलीय. या चित्रपटातील एक सीन करण्यासाठी रम्याला दोन दिवसांत ३७ रिटेक घ्यावे लागले. यावरून ही भूमिका रम्यासाठी किती चॅलेंजिंग असेल, याची कल्पना तुम्ही करू शकता.

अलीकडे रम्या या चित्रपटाबद्दल बोलली. मी हा चित्रपट साईन केला तेव्हा प्रत्येकालाच धक्का बसला होता. माझ्यापेक्षा माझे सहकारी धक्क्यात होते. माझ्या मते, काही भूमिका पैशांसाठी असतात. काही लोकप्रियता मिळवण्यासाठी आणि काही पॅशनसाठी. ‘सुपर डिलक्स’ मी पॅशनसाठी साईन केला, असे रम्या म्हणाली. दिग्दर्शक त्यागराजन यांचे मानाल तर या भूमिकेत स्वत:ला फिट बसवणे रम्यासाठी सोपे नव्हते.

 पोर्न स्टारच्या भूमिकेत रम्या म्हटल्यावर आधी सगळ्यांनीच मला वेड्यात काढले. कारण रम्या या भूमिकेसाठी अतिशय कूल होती. आधी या रोलसाठी आम्ही नाडियाशी संपर्क साधला होता. पण नंतर मी रम्याच्या नावाला पसंती दिली. या भूमिकेसाठी रम्याने स्वत:ला तिच्या कंफर्ट झोनमधून बाहेर काढले, असे त्यागराजन यांनी सांगितले.

‘सुपर डिलक्स’ या तामिळ चित्रपटात रम्या लीला नावाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता विजय सेथुपतीची भूमिका एकदम अनोखी आहे. यात तो फिमेल गेटअपमध्ये दिसणार आहे. रम्या व विजय सेतुपतीशिवाय समांथा, फहाद फासिल, मास्किन यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

टॅग्स :रम्या कृष्णन