Join us  

'It’s a Girl...' ! आयुष्यमान खुराणा व ताहिरा कश्यपच्या घरी नवी ‘फॅमिली मेंबर’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 4:11 PM

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने आयुष्यमान व ताहिरा जाम खुश आहे.

ठळक मुद्देआयुष्यमानने 2011 मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी 11 वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. 

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप यांच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाने आयुष्यमान व ताहिरा जाम खुश आहे. ताहिरा तर भलतीच खुश आहे. या खुशीत सोशल मीडियावर या नव्या पाहुण्यासोबतचे काही फोटो तिने शेअर केले आहेत. आता हा नवा पाहुणा कोण तर पीनट. होय, अर्थात पीनट नावाचा डॉगी.‘आमच्या कुटुंबातील नवीन सदस्य. ही एक मुलगी आहे आणि तिचे नाव पीनट आहे...,’ अशी पोस्ट ताहिराने शेअर केली.  

‘आम्ही सर्वच तिचे खूप लाड करत आहोत. पीनट आमच्या आयुष्यात आली, याची एक खास गोष्टही आहे,’ असे म्हणत, तिने पुढे लिहिले, ‘पीनटला घेण्यात आम्हाला मदत करणा-या व्यक्तिने सांगितले की, अनेक लोक केवळ मेल डॉग्जच घेतात. पण  पण पीनटचा भाऊ किती क्यूट होता याने आम्हाला काही फरक पडला नाही. कारण पीनट आमची कधीच दुसरी निवड नव्हती. ती नेहमीच पहिली निवड होती. कृपया तिचे स्वागत करा.’

ताहिराच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. ताहिराचा दीर आणि आयुष्मानचा भाऊ अपारशक्ती खुराना याने ‘आम्ही आत्ताच नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी येत आहोत,’अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री क्रिती सॅनन, नुसरत भरूचा, यामी गौतम आदींनी पीनटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आयुष्यमानने 2011 मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केले. त्याआधी 11 वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होत़े. ताहिरा 16 वर्षांची होती, तेव्हा दोघांची भेट झाली होती. ताहिराच्या वडिलांना आयुष्यमान खूप आवडायचा. हा मुलगा तुला खूप आनंदी ठेवेन, असे ते आपल्या मुलीला म्हणाले होते. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.आयुष्मान एक चांगला गायक आणि गीतकारही आहे. ‘विकी डोनर’मधील पानी दा रंग हे गाणे आयुष्यमानने स्वत: लिहिले होते, शिवाय स्वत:च ते गायले होते.

आयुष्यमान खुराणा खऱ्या आयुष्यातही होता ‘विकी डोनर’!!

टॅग्स :आयुषमान खुराणाताहिरा कश्यप