Join us  

शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना अधिक सक्षम बनवणे शक्य- आयुष्यमान खुराणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 5:32 PM

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (2018)नुसार, भारतात दर तासात बाल लैंगिक शोषणाची पाच प्रकरणे घडतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4 नुसार दर पाचपैकी एका किशोरवयीन मुलीला 15 व्या वर्षापासून शारीरिक हिंसेचा अनुभव येतो.

इंटरनेटचा पुरेपूर वापर करताना योग्य शिक्षणामुळे मुलांना मार्गदर्शन मिळू शकते, या मुद्द्यावर आजच्या सेफर इंटरनेट डेच्या निमित्ताने आयुष्यमान आणि युनिसेफने पुन्हा एकदा एकत्र येत लक्ष केंद्रीत केले आहे.

"ऑनलाइन जगात मुलांना शिकण्याच्या आणि आपल्या कल्पना मांडण्याच्या अप्रतिम संधी उपलब्ध असतात. आजच्या सेफर इंटरनेट डेच्या निमित्ताने मुलांना, विशेषत: मुलींना इंटरनेटचा वापर करून उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मार्गाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देऊया," असे आयुष्यमान म्हणाला. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डफ अॅण्ड फेल्प्स अहवालानुसार आयुष्यमान हा इंटरनेटवरील सर्वाधिक वेगाने लोकप्रिय ठरणारा बॉलिवुड स्टार आहे. 2019 च्या तुलनेत त्याच्या सोशल मीडिया फॉलोइंगमध्ये 70 टक्क्यांनी वाढ झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

तो पुढे म्हणाला, "इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या संधी अमर्याद आहेत. मुलांना शिकण्यासाठी, त्यांच्या कल्पना मांडण्यासाठी संपूर्ण जग उपलब्ध आहे. इंटरनेटवर असंख्य कल्पना आणि सर्जनशीलता आहे, अगदी मुलांच्या मनाप्रमाणेच. पण यात काही धोकेही आहेत. अर्थात योग्य शिक्षणासह आपण मुलांना ऑनलाइन सुरक्षित राहण्यासाठी सक्षम करू शकतो. या सेफर इंटरनेट डेच्या निमित्ताने ऑनलाइन अत्याचार नष्ट होईल आणि प्रत्येक मुलासाठी ऑनलाइन जग सुरक्षित बनेल यासाठी प्रयत्न करूया."

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (2018)नुसार, भारतात दर तासात बाल लैंगिक शोषणाची पाच प्रकरणे घडतात. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-4 नुसार दर पाचपैकी एका किशोरवयीन मुलीला 15 व्या वर्षापासून शारीरिक हिंसेचा अनुभव येतो. तर, 99 टक्के शालेय मुलांना शिक्षकांकडून शारीरिक आणि मानसिक छळाचा अनुभव येतो (नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स 2012). ही आकडेवारी फक्त नोंद झालेल्या घटनांची आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणा