Join us  

त्या एका फोन कॉलने बदलले आयुषमानचे आयुष्य, रेडिओ जॉकी ते अभिनेत्यापर्यंत वाचा त्याचा थक्क करणार प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 5:08 PM

आयुषमान खुराणाचा ड्रीम गर्ल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुषमान खुराणा आजच्या घडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे.

आयुषमान खुराणाचा ड्रीम गर्ल सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुषमान खुराणा आजच्या घडीला इंडस्ट्रीतले मोठे नाव आहे. सिनेमात येण्यापूर्वी त्यांने पाच वर्षे थिएटरमध्ये काम केले आहे. आयुष्यमान एमटीव्हीवर येणा-या रोडिज या शोच्या दुस-या सीझनचा विजेता होता. 'विकी डोनर’ सिनेमातून त्यांने आपल्या करिअरला सुरुवात केली. हिंदी Rushच्या रिपोर्टनुसार आयुष्यमानने त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक किस्से शेअर केले आहेत. आयुष्यमान म्हणाला, मी दिल्लीत शिक्षण पूर्ण झाल्यावर रेडिओ जॉकीचे काम करत होता. तेव्हा एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा मला फोन आला आणि त्यानंतर माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेले.  

रिपोर्टनुसार आयुषमान म्हणाला, माझ्या करिअरमध्ये सगळ्यात मोठं योगदान माझ्या वडिलांचं आहे. त्यांनी मला खूप मदत केली. माझं जर्नलिझमच्या परीक्षा सुरु होत्या आणि मी थिएटर करत होतो. त्याच दरम्यान मला दिल्लीत रेडिओ जॉकीची नोकरी मिळाली. मी विचार केला काही दिवसांनी मी मुंबईत जाईन आणि अभिनयात हात आजमावेन तोपर्यंत हातात काही पैसे सुद्धा येतील.

पण एक दिवस अचानक माझ्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी मला मुंबईला जायला सांगितले. हे ऐकून माझं सहकारी हैराण झाले की इकडे सगळं काही ठिक चालू असताना अचनाक मुंबईला का जायचंय. मात्र मी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे मुंबईत निघून आलो आणि त्यादिवसानंतर मी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आयुष्मानचे वडील एक प्रसिद्ध ज्योतिषार्चाय आहेत. आयुष्मानला बधाई सिनेमासाठी नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.

   वर्कफ्रंट बाबात बोलायचे झाले तर आयुषमानचा  ड्रीम गर्ल १३ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.या चित्रपटात आयुषमान एका मुलाची भूमिका साकारणार आहे जो रामलीलामध्ये सीतेची भूमिका साकारत असतो. त्यानंतर वडीलांच्या टीकेमुळे तो कॉल सेंटरमध्ये नोकरी करतो. कॉल सेंटरमध्ये तो मुलीच्या आवाजात कस्टमर्ससोबत बोलत असतो. मथुरा शहरातील सर्व तरूण त्याच्या आवाजाचे वेडे होतात. आयुषमानचे चाहते त्याच्या ड्रीम गर्ल चित्रपटाची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.

टॅग्स :आयुषमान खुराणा