Join us  

Ayushmann Khurrana Birthday Special : या कारणामुळे आयुषमान खुराणा साजरा करत नाही त्याचा वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 12:51 PM

आयुषमानला त्याचा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती.

ठळक मुद्देमी बर्थडे पर्सन नाहीये. मला माझा वाढदिवस साजरा करायलाच आवडत नाही. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला अनेक वेळा खूप ड्रिप्रेस झाल्यासारखे वाटते. त्यामुळे मी माझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही.

आयुषमान खुराणाचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म चंडिगडमधील आहे. त्याचे खरे नाव आयुषमान नव्हे तर निशांत खुराणा आहे. पण तो तीन वर्षांचा असताना त्याच्या पालकांनीच त्याचे नाव बदलले. त्याचे शिक्षण पंजाबमध्येच झाले. त्यानंतर त्याने रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. तो 17 वर्षांचा असताना चॅनल व्हीवरील एका कार्यक्रमात तो झळकला होता. 

आपला वाढदिवस असला की, प्रत्येक व्यक्ती आपल्या वाढदिवसाच्या बाबतीत खूपच उत्सुक असतो. काहीजण तर वाढदिवसाच्या कित्येक दिवस आधीपासूनच वाढदिवसाला कुठे पार्टी करायची, कुठे फिरायला जायचे हे आधीच ठरवतात. पण य सगळ्या गोष्टींना आयुषमान अपवाद आहे. आयुषमानला त्याचा वाढदिवस साजरा करायला आवडत नाही. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. त्याने या मुलाखतीत सांगितले होते की, मी बर्थडे पर्सन नाहीये. मला माझा वाढदिवस साजरा करायलाच आवडत नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मला अनेक वेळा खूप ड्रिप्रेस झाल्यासारखे वाटते. त्यामुळे मी माझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही. मी वाढदिवसाची पार्टी देखील वाढदिवसाच्या दिवशी न करता नंतर काही दिवसांनी करतो. 

आयुषमानने आरजे म्हणून देखील काम केले आहे. छोट्या पडद्यावर काम केल्यानंतर त्याला विकी डोनर या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या पहिल्याच चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्याने आजवर शुभ मंगल सावधान, बधाई हो, बरेली की बर्फी, आर्टिकल 15 यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचे चित्रपट म्हटले की, ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करणार असे त्याच्या फॅन्सना चांगलेच ठाऊक असते. त्याला आजवर त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

आयुषमान खुराणाचे लग्न ताहिरा कश्यपसोबत झाले असून ताहिरा ही त्याची बालमैत्रीण आहे. अनेक वर्षांच्या अफेअरनंतर त्या दोघांनी 2008 मध्ये लग्न केले. त्यांना वीराजवीर आणि वरुष्का अशी दोन मुलं आहेत. 

टॅग्स :आयुषमान खुराणाताहिरा कश्यप