Join us  

आयुष्मान खुरानाच्या पत्नीलाही या आजाराने ग्रासलं, सध्या उपचारांसह कामावरही केले लक्ष केंद्रीत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 9:15 PM

कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करत असताना ताहिरा खुराना कामावरही तितकेच लक्ष देत आहे. कामासह किमोथेरेपिही घेत आहे.

गेल्या काही वर्षात बॉलीवुडला कॅन्सर या आजाराचे ग्रहण लागलं आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधी मनीषा कोईराला, इरफान खान, सोनाली बेंद्रे अशा बड्या कलाकारांना या महाभयानक आजाराचा सामना करावा लागत आहे. यांत आणखी एका नावाची भर पडली असून तिचे नाव ताहिरा कश्यप असे आहे. ताहिरा ही अभिनेता आयुष्मान खुराना याची पत्नी आहे. ती एक लेखिका,प्राध्यापिका आहे. ताहिरा-आयुष्मानने११ वर्षे सोबत राहिल्यानंतर २०११ मध्ये लग्न केले होते. याचवर्षी सप्टेंबरमध्ये ताहिराने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला होता. “हा फोटो कुणाला विचलितही करू शकतो. डाव्या स्तनामध्ये घातक पेशींसोबतच DCIS (ductal carcinoma in situ) असल्याचे कळले आहे.

सरळ सरळ सांगायचे तर झीरो स्टेजचा कॅन्सर झाला आहे. कॅन्सरच्या पेशी वाढत असल्याने अँजेलिना जोलीसारखी हाफ इंडियन वर्जन बनले आहे. जीवनाच्या अघटित, अकाली घडणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करा आणि आयुष्यातील ड्रामाचा हीरो बनण्याची हिम्मत आणि विश्वास ठेवा" अशी भावनिक पोस्ट तिने शेअर केली होती. ताहिरा कश्‍यपची आपल्या कामावर प्रचंड निष्ठा आहे. नवीन वर्षात ती दिग्दर्शिका म्हणून नवी इनिंग सुरू करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ठरवलेल्या वेळेतच व्हावे, यासाठी ती कोणतीही कसर सोडत नाही.

कॅन्सरसारख्या आजाराचा सामना करत असताना ती कामावरही तितकेच लक्ष देत आहे. कामासह किमोथेरेपिही घेत आहे. हे करता करता सिनेमाच्या प्री-प्रोडक्‍शनचे कामही करत आहे. या थेरेपीजमुळे शरीर आणि मन दोन्हींवर खूप परिणाम होतो. माणसाला एनर्जेटिक राहणे शक्य होत नाही. ताहिरा स्वतःसोबत असे होऊ देत नाही. ती कीमो केल्यानंतर प्री-प्रोडक्‍शनचे काम तर करते. सोबतच आठवड्यातून दोन-तीन लेक्‍चरही घेते. आतापर्यंत तिचे ८ किमो झाले असून ४ अजून बाकी आहेत. त्यामुळे ताहिराने या आजारातून एका लढवय्याप्रमाणे बरं व्हावे अशी आयुष्यमानच्या आणि ताहिराच्या नातेवाईकांसह रसिकांची प्रार्थना आहे. 

टॅग्स :आयुषमान खुराणा