Join us  

OMG...! १४ वर्षांत इतकी बदलली ही अभिनेत्री, 'ब्लॅक'मध्ये साकारली होती राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 4:58 PM

'ब्लॅक' चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अमिताभ बच्चन व राणी मुखर्जी यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं होतं.

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळीने हिंदी चित्रपटसृष्टीत असे सिनेमे दिले आहेत जे मैलाचा दगड ठरलेत. त्यातीलच एक चित्रपट आहे ब्लॅक. ब्लॅक चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील अमिताभ बच्चनराणी मुखर्जी यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्क्रात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याशिवाय या चित्रपटातील आणखीन एका व्यक्तीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या अभिनेत्रीचं नाव आहे आयशा कपूर. आयशाने ब्लॅक चित्रपटात राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका केली होती. या चित्रपटाला १४ वर्षांचा काळ गेला असून आयशामध्ये खूप मोठा बदल झालेला पहायला मिळतो आहे. 

आयशा कपूरने ज्यावेळी ब्लॅक चित्रपटात काम केलं होतं. त्यावेळी ती फक्त १० वर्षांची होती. आता ती २४ वर्षांची आहे. आयशा आता मोठी झाली असून तिच्या लूकमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. ब्लॅक चित्रपटानंतर ती सिकंदर चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट २००९ साली प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटानंतर आयशा फिल्म इंडस्ट्रीमधून गायब झाली. आयशा सध्या आईसोबत ज्वेलरी ब्रॅण्डसोबत जोडली गेली आहे. हा ज्वेलकी ब्रॅण्ड ज्वेलरी बनवण्याचं काम करतं. आयशा अभिनेत्री व बिझनेसवुमेन शिवाय लेखिका देखील आहे. ती ब्लॉगदेखील लिहते आणि तिच्या फॉलोवर्सची संख्यादेखील जास्त आहे.

आयशा कपूर इंस्टाग्रामवर सक्रीय असून ती योगा व फोटोशूटचे फोटो शेअर करत असते. फोटोमध्ये आयशाच्या चेहऱ्यावरील निरागसता अजूनही पहायला मिळते. सूत्रांच्या माहितीनुसार आयशा कपूर अदम ऑबेरॉयला डेट करते आहे. त्याच्यासोबतचे काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ब्लॅकमधील दमदार अभिनयासाठी आयशाला फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला आहे. आयशाने कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन केलं आहे.

आयशाची आई जर्मनला स्थायिक असून तिच्या वडिलांचा लेदर बॅग्सचा इंटरनॅशनल ब्रॅण्ड आहे.

टॅग्स :राणी मुखर्जीअमिताभ बच्चन