Join us  

फॅशनिस्टा नाही ही तर भूतनी दिसतेय, सोनम कपूर विनामेकअप लूकमुळे झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 4:16 PM

2018 मध्ये सोनमने आनंद आहुजाशी लग्न केले. आनंद आहूजामुळे जास्त चर्चेत असते.आनंदही व्यवसाय जगतात एक मोठे नाव आहे. रिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे.

बॉलीवुडची मस्सकली सोनम कपूरनेही तिच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले एक स्ठान निर्माण केले आहे. बॉलिवूडची आघाडीची नायिका म्हणून सोनम ओळखली जाते. तिच्या अभिनयाप्रमाणेच तिच्या सौंदर्यांचेही दिवाने आहेत. नेहमीच आपल्या स्टाइलमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री सोनम कपूरची फॅशन सेन्सची कायमच चर्चा असते.इतकेच काय तर स्टाईल दिवा म्हणून सोनमनं वेगळीच ओळख निर्माण केलीय. 

 

सोनम सोशल मीडियावरही प्रचंड एक्टीव्ह असून चाहत्यांसह तिचे फोटो व्हिडीओ ती शेअर करत असते. नुकताच तिने तिचा मेकअप ट्युटोरिअरलचा व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर होताच अवघ्या काही तासांतच तुफान व्हायरल झाला आहे. सोनम कपूरचा विनमामेकअप लूक पाहून तिला नेटीझन्सने ट्रोल करायला सुरुवात केली. विनामेकअप पाहून अनेकांनी नको नको त्या कमेंट करत तिची खिल्ली उडवताना दिसले. मेकअपमध्ये जितकी सुंदर सोनम दिसते तितकी विनामेकअप दिसत नसल्याने अनेकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली होती.

2018 मध्ये सोनमने आनंद आहुजाशी लग्न केले. आनंद आहूजामुळे जास्त चर्चेत असते.आनंदही व्यवसाय जगतात एक मोठे नाव आहे. रिपोर्टनुसार आनंद आहूजाची वार्षिक कमाई 450 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे, जी भारतीय चलनानुसार 3000 कोटी इतकी आहे. सोनम आणि आनंद एकत्र मिळून वर्षाला सुमारे 3085 कोटी रुपये कमवतात. ज्यामुळे दोघेही बॉलिवूडमधील एक अतिशय यशस्वी आणि श्रीमंत जोडी मानली जाते.

 

सध्या ती तिची मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. कधी मुंबईत तर कधी लंडन ती ये-जा करत असते. मुळात लग्नानंतरही आनंद आणि सोनम एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत नाहीत. दोघेही आपल्या करियरमध्ये इतके व्यस्त असतात की दोघांनाही एकमेकांसाठी वेळच मिळत नाही. 

सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, "आनंद बर्‍याचदा मुंबईत कामानिमित्त येत असतो, कामाच्या निमित्ताने बहुतेक वेळ तो मुंबईत घालवतो.मी लंडन आणि दिल्लीमध्ये जास्त राहते. धावपळीच्या जगात प्रवास करणे मात्र अतिशय सोयीचे झाले आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच एकमेकांना भेटण्यासाठी जिथे असू तिथे जातो. मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करतो आणि परत कामात व्यस्त होतो.

 

टॅग्स :सोनम कपूर