Join us

असीन-राहुलचे 'सेव द डेट' चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:55 IST

अभिनेत्री असीन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्या विवाहाने २0१६ मधील बॉलिवूड स्टार्सच्या लग्नाचा मोसम सुरू होत आहे. या ...

अभिनेत्री असीन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांच्या विवाहाने २0१६ मधील बॉलिवूड स्टार्सच्या लग्नाचा मोसम सुरू होत आहे. या दोघांचा विवाह येत्या 19 जानेवारीला आहे. असीन-आणि राहुल यांनी आपल्या लग्नाच्या तारखेची आठवण करून देण्यासाठी पाठवलेले 'सेव्ह द डेट' कार्ड सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरले आहे. या लग्नासाठी जे गेस्ट निमंत्रित आहेत, त्यांना सोनेरी रंगाचे सुंदर असे कार्ड पाठवण्यात आले आहे. ''सेव्ह द डेट : सेलिब्रेटिंग असीन अँण्ड राहुल. इनव्हाईट टू फॉलो..'' असा मजकूर त्यात आहे. दिल्लीस्थित एका एन्टरटेन्मेंट डिझाईन कंपनीने हे कार्ड डिझाईन केले आहे. हे लग्न दिल्लीत होणार असून रिसेप्शनचा सोहळा मुंबईत रंगणार आहे.