Join us  

Exclusive : अश्विनी अय्यरने तीन वर्षापूर्वी या क्षेत्रात केले होते पदार्पण, आज आहे टॉपची दिग्दर्शिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 10:38 AM

दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी आता हे नाव घराघरात पोहोचले आहे. तीन वर्षापूर्वी 22 एप्रिलला स्वारा भास्करसोबत नील बत्तू सन्नता सिनेमाच्या माध्यमातून अश्विनीने दिग्दर्शनात पदार्पण केले होते.

ठळक मुद्देतिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता

दिग्दर्शिका अश्विनी अय्यर तिवारी आता हे नाव घराघरात पोहोचले आहे. तीन वर्षापूर्वी 22 एप्रिलला स्वारा भास्करसोबत नील बत्तू सन्नता सिनेमाच्या माध्यमातून अश्विनीने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. तिचा पहिलाच सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. पदार्पणातच अश्विनीला फिल्मफेअर अॅवॉर्ड, स्क्रिन अॅवॉर्ड आणि झी सिने अॅवॉर्ड असे तब्बल तिने पुरस्कार मिळाले. यानंतर अश्विनी मागे वळून पाहिलेच नाही. 

तिचा आयुष्यमान खुराणा आणि क्रिती सॅननची मुख्य भूमिका असलेला 'बरेली की बर्फी'  सिनेमाही प्रेक्षकांना आवडला. एकाहुन एक दर्जेदार कलाकृती अश्वनीने प्रेक्षकांना दिल्या. सध्या ती 'पंगा' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'पंगा' हा सिनेमा कबड्डी खेळावर आधारीत आहे.  या सिनेमात कंगना राणौत मुख्य भूमिका साकारतेय.  कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे़.

'पंगा'विषयी बोलताना अश्विनी अय्यर तिवारी म्हणाली की, 'या सिनेमात कंगना रानौतची बॉडी डबल वापरायची नव्हती. त्यामुळे कंगनाला ट्रेनिंग घ्यायला सांगितले. तर कंगना रानौतदेखील कबड्डी खेळ खूप एन्जॉय करते आहे. यापूर्वी ती कधीच कबड्डी खेळलेली नाही आणि तिच्यासाठी हा खेळ नवादेखील नाही. त्यामुळे तिला या खेळातील बारकावे समजायला कोणताच त्रास होत नाही.' हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला होणार आहे.

टॅग्स :अश्विनी अय्यर तिवारी