Join us  

‘या’ विवाहित अभिनेत्रीवर जडले होते आशुतोष राणाचे प्रेम; सेटवरून धक्के मारून काढले बाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 10:29 AM

‘जख्म’, ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या वाहवा मिळविलेला अभिनेता आशुतोष राणा आज ५०वा वाढदिवस ...

‘जख्म’, ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार अभिनय करून प्रेक्षकांच्या वाहवा मिळविलेला अभिनेता आशुतोष राणा आज ५०वा वाढदिवस साजरा करीत आहे. ‘स्वाभिमान’ या टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात करणारा आशुतोष मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. ‘दुश्मन’मध्ये सायको किलरची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या अंगावर शहारे उभे करणाºया आशुतोषने अनेक दमदार भूमिका साकारल्या. त्यामुळेच आशुतोषला वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी ओळखले जाते. वास्तविक आशुतोष पूजापाठ करणारा अतिशय धार्मिक व्यक्ती आहे. भगवान शिवचा तो खूप मोठा भक्त आहे. त्याचे देवावर प्रचंड आस्था आणि विश्वास आहे. आशुतोषने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मी माझ्या गुरूच्या सांगण्यानुसारच चित्रपटसृष्टीत आलो. आतापर्यंत मी ३० पेक्षा अधिक चित्रपट केले. त्याचबरोबर बºयाचशा टीव्ही मालिकांमध्येही काम केले. आशुतोषच्या आयुष्यात एक दिवस असाही आला होता, जेव्हा त्याला सेटवरून धक्के मारून बाहेर काढण्यात आले होते. आज त्याच आशुतोष राणाने आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्याच्याविषयीच्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. आशुतोषने एका मुलाखतीत सांगितले की, ‘एकदा मी निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांना भेटण्यासाठी गेलो होतो. भारतीय परंपरेनुसार मी त्यांच्यासमोर जाताच त्यांच्या पाया पडलो. मात्र माझी ही कृती त्यांना अजिबातच आवडली नाही. ते प्रचंड संतापले. कारण पाया पडणाºयांचा त्यांना प्रचंड संताप वाटतो. त्यांनी मला थेट चित्रपटाच्या सेटवरून बाहेर हाकलून दिले. ऐवढेच काय तर माझ्यामुळे ते त्यांच्या सहायक दिग्दर्शकांवरही प्रचंड बरसले. अखेर मला सेटवर कोणी येऊ दिले असा ते सातत्याने विचारत असत.’ पुढे बोलताना आशुतोषने म्हटले की, एवढा अपमान होऊनदेखील मी हिम्मत हारली नाही. त्यानंतर जेव्हा-केव्हा महेश भट्ट भेटायचे तेव्हा मी पटकन त्यांच्या पाया पडायचो. काही काळानंतर महेश भट्ट यांनी मला अखेर विचारले की, ‘मी तुझा एवढा राग करीत असतानाही तू माझ्या पाया का पडतो. तेव्हा मी त्यांना उत्तर दिले की, मोठ्यांचा आशीर्वाद घेणे हे माझे संस्कार असून, ते मी कधीच विसरणार नाही. आशुतोषचे हे शब्द ऐकताच महेश भट्ट यांनी त्याला मिठी मारली. पुढे ‘स्वाभिमान’ या मालिकेत खलनायकाची पहिली भूमिकाही दिली. पुढे आशुतोषने महेश भट्ट यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘जख्म, दुश्मन’ हे त्यातील प्रमुख चित्रपट आहेत. राष्टÑीय नाट्य विद्यालयात (एनएसडी) १९९४च्या बॅचचा विद्यार्थी असलेला आशुतोष सांगतो की, मी मध्य प्रदेशात राहणारा एक सर्वसामान्य विद्यार्थी होतो. एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वकील म्हणून करिअर करण्याची माझी इच्छा होती. आशुतोषने सांगितले की, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मला एनएसडीमध्ये नोकरीची आॅफर आली होती. मात्र मी चित्रपटसृष्टीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. आशुतोष राणा याच्या पर्सनल लाइफविषयी सांगायचे झाल्यास, त्याला अभिनेत्री रेणुका शहाणे हिच्याशी लग्न करायचे होते. रेणुका आणि आशुतोषची पहिली भेट ‘जयती’च्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यानंतर कित्येक महिने दोघांमध्ये बोलणे झाले नव्हते. पुढे आॅक्टोबर १९९८मध्ये आशुतोषने फोन करून रेणुकाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन-तीन दिवस सतत त्याने रेणुकाला फोन केले. रेणुकाला आशुतोषचे असे वागणे सामान्य बाब वाटत होती. एक दिवस रेणुकाने आशुतोषला फोन केला. तिने तब्बल तासभर आशुतोषची फोनवर संवाद साधला. त्यानंतर तीन महिने दोघे फोनवर एकमेकांशी संवाद साधत राहिले. रेणुकाचे एक लग्न अगोदरच मोडले होते. ही बाब आशुतोषला अगोदरच माहिती होती, अशातही त्याने रेणुकावर विश्वास दाखविला. आता दोघांना शौर्यमन आणि सत्येंद्र नावाचे दोन मुले आहेत.