Join us  

आशा पारेख सांगतायेत, या व्यक्तीवर होते जीवापाड प्रेम... पण होऊ शकले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2019 3:32 PM

आशा पारेख यांनी लग्न न करता एकटेच राहाणे पसंत केले. त्यांनी लग्न का केले नाही याविषयी त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

ठळक मुद्देआशा पारेख यांचे प्रेम दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर होते. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये आशा पारेख महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. नासिर हे आमिर खान यांचे काका होते.  

आशा पारेख यांनी अतिशय लहान वयात अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. त्यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. शाळेत असताना त्या प्रत्येक मित्र आणि शिक्षकांची नक्कल करायच्या. १९५२ मध्ये आलेल्या ‘माँ’ या चित्रपटानंतर अनेक चित्रपटात त्या बालकलाकार म्हणून दिसल्या. पण पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी अभिनयक्षेत्र सोडले. अर्थात त्या फार काळ अभिनयापासून दूर राहू शकल्या नाहीत. सोळाव्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला. ‘दिल देके देखो’या चित्रपटानंतर आशा पारेख रातोरात स्टार झाल्या. यानंतर नासिर हुसैन यांनी आशा यांना आपल्या सहा चित्रपटांसाठी साईन केले होते. ‘जब प्यार किसी से होता है’,‘फिर वो ही दिल लाया हूँ’,‘तिसरी मंजिल’,‘बहारों के सपने’,‘प्यार का मौसम’,‘कारवाँ’ असे हे सहाही चित्रपट हिट ठरले होते.

आशा पारेख यांनी लग्न न करता एकटेच राहाणे पसंत केले. त्यांनी लग्न का केले नाही याविषयी त्यांनी द हिट गर्ल या त्यांच्या ऑटोबायोग्राफीत लिहिले आहे. याविषयी त्यांनी नुकतेच वर्व या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत देखील सांगितले. त्यांनी या मुलाखतीत सांगितले की, मी माझ्या आयुष्यात घेतलेला सगळ्यात चांगला निर्णय म्हणजे सिंगल राहाणे... मी एका लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करत होती. पण कोणाचे घर तोडून मला माझा संसार थाटायचा नव्हता. त्यामुळे मी सिंगल राहाण्याचा निर्णय घेतला आणि आयुष्यभर मी एकटीच राहिले. 

आशा पारेख यांचे प्रेम दिग्दर्शक नासिर हुसैन यांच्यावर होते. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये आशा पारेख महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. नासिर हे आमिर खान यांचे काका होते.  

१९९५ मध्ये आशा पारेख यांनी अभिनयाला रामराम ठोकला आणि एक प्रॉडक्शन कंपनी सुरू केली. याअंतर्गत त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती केली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आशा पारेख एकट्या पडल्या होत्या. यादरम्यान त्यांच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊन गेलेत. एका मुलाखतीत त्यांनी हे सांगितले होते. एकाकीपणाच्या त्या काळात मी डिप्रेशनमध्ये गेले होते. मी आत्महत्येचा विचारही केला होता. पण यानंतर मी डिप्रेशनवर उपचार केले आणि यातून बाहेर पडले.

टॅग्स :आशा पारेखआमिर खान