‘सरबजीत’मधील ऐश-रणदीपचा न्यू स्टील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 10:46 IST
‘सरबजीत’ मधील अनेक फोटो रिलीज केल्यानंतर अजुनही चित्रपटाची टीम चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवण्यासाठी फोटो रिलीज करत आहे. नुकताच चित्रपटातील एक ...
‘सरबजीत’मधील ऐश-रणदीपचा न्यू स्टील!
‘सरबजीत’ मधील अनेक फोटो रिलीज केल्यानंतर अजुनही चित्रपटाची टीम चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढवण्यासाठी फोटो रिलीज करत आहे. नुकताच चित्रपटातील एक न्यू स्टील लाँच करण्यात आला आहे.या फोटोत रणदीप हुडा आणि ऐश्वर्या रॉय बच्चन हे बहीण-भाऊ यांच्या भूमिका साकारत आहेत. एक मेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री ही फारच नाजूक आणि हृदयाला हात घालणारी आहे. तसेच, ऐश्वर्या आणि रणदीप त्यांच्या ट्रेडिशनल पण स्टायलिश लुक्समध्ये दिसत आहे.त्यांना दोघांना एकत्र पाहणे म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित असून सरबजीत सिंग याच्या आयुष्यावर आधारित आहे. सरबजीत पाकिस्तान कोर्टात भारताचा गुप्तहेर म्हणून पकडला गेला.त्याला सोडवण्यासाठी त्याची बहीण दलबीर कौर हिची लढाई म्हणजे ‘सरबजीत’ आहे.