Join us

नोव्हेंबरमध्ये असीन चढणार बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:54 IST

'गजनी' फेम बॉलीवुड अभिनेत्री असीन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. दिल्लीतला बिझीनेसमन आणि मायक्रोमॅक्सचा को फाउंडर असणारा तिचा बॉयफ्रें ड ...

'गजनी' फेम बॉलीवुड अभिनेत्री असीन लवकरच बोहल्यावर चढणार आहे. दिल्लीतला बिझीनेसमन आणि मायक्रोमॅक्सचा को फाउंडर असणारा तिचा बॉयफ्रें ड राहुल शर्मा सोबत येत्या २६ नोव्हेंबरला दिल्लीतील एका हॉटेलमध्ये तिचे लग्न होणार असल्याची बातमी सुत्रांकडून मिळाली आहे. कुटुंबातील लोक आणि अगदी जवळचे मित्र यांनाच लग्नाचे आमंत्रण असणार आहे. २७ नोव्हेंबरला वेस्ट अँड ग्रीन्सच्या एका प्रायव्हेट हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. इथेच शाहिद-मीराचे लग्न झाले होते. यानंतर मुंबईमध्ये सुद्धा असीनच्या मित्रांसाठी एक रिसेप्शन ठेवण्यात येणार आहे परंतु याची तारिख मात्र अजुन निश्‍चित झालेली नाही. लग्नाच्या तयारीला तर जोरदार सुरूवात झालेली आहे. 'ऑल इज वेल' या चित्रपटात झळकलेली असीन लग्नानंतर बॉलीवुडला कायमचा रामराम ठोकणार आहे, असे समजते.