Join us  

OMG!! वडिलांचं वागणं पाहून अरबाज मर्चंटनं मारला कपाळावर हात; नेटकरी म्हणाले, पापा रॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 5:19 PM

अरबाज मर्चंट कोण तर Aryan Khanचा जवळचा मित्र. आर्यनसोबत अरबाजनेही 26 दिवस तुरुंगात काढले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

शाहरूख खानचा लेक आर्यन खानला (Aryan Khan) क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (Drugs O n Cruise Case) अटक झाली आणि त्याच्यासोबत अरबाज मर्चंट (Arbaaz Merchant) व मुनमुन धमेचा ही दोन नावंही चर्चेत आली. अरबाज मर्चंट कोण तर आर्यनचा जवळचा मित्र. आर्यनसोबत अरबाजनेही 26 दिवस तुरुंगात काढले.  नुकतीच त्यांची जामीनावर सुटका झाली. अर्थात काही अटींवर. त्यानुसार, दर शुक्रवारी त्यांना एनसीबीच्या  (NCB) कार्यालयात हजेरी लावावी लागते. आज अरबाज एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावण्यासाठी आला. मात्र यादरम्यान जे काही घडलं, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.अरबाज त्याचे वडील अस्लम मर्चंट यांच्यासोबत एनसीबीच्या कार्यालयात पोहोचला. कार्यालयातून बाहेर येत असताना मीडियाच्या फोटोग्राफर्सनी त्यांना घेरलं. अरबाज मीडियाला पोझ देण्याच्या मन:स्थितीत नव्हताच. पण पापा मात्र अगदी राजीखुशीत पोझ द्यायला तयार झाले. इतकंच नाही तर ते अरबाजलाही   पोज देण्यास सांगतात.

आधी अरबाजला काहीही कळत नाही. पण पापा शो-ऑफ करत आहे, हे समजताच, तो  त्यांच्यावर चांगलाच संतापतो. अगदी कपाळाला हात मारून घेत ‘स्टॉप इट’असं रागारागात म्हणत थेट गाडीकडे वळतो. पापा तरीही त्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. अखेर हसत हसत पापा अरबाजच्या मागे चालू लागतात. अरबाज आणि त्याच्या वडिलांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. विशेष म्हणजे, नेटकºयांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.हाहाहा, टॉपिकल पापा..., अशी कमेंट एका युजरने केली आहे. एकाने पापा रॉक्स असं लिहिलं आहे. डॅडी कूल का अवार्ड इतको ही मिलना चाहिए, अशी कमेंट एकाने केली आहे. या पापांना लेकाचा इतका कसला अभिमान वाटतोय, तो ड्रग्ज प्रकरणात अडकलाय, अशी कमेंट अन्य एका युजरने केली आहे. 

टॅग्स :आर्यन खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी