आर्य बब्बर-जस्मिनचा विवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2016 02:04 IST
अभिनेते व नेते राज बब्बर यांचा ज्येष्ठ चिरंजीव अभिनेता आर्य बब्बर हा त्याची प्रेयसी जास्मिन पुरी हिच्यासह विवाहबंधनात अडकला. ...
आर्य बब्बर-जस्मिनचा विवाह
अभिनेते व नेते राज बब्बर यांचा ज्येष्ठ चिरंजीव अभिनेता आर्य बब्बर हा त्याची प्रेयसी जास्मिन पुरी हिच्यासह विवाहबंधनात अडकला. मागील काही वर्षांपासून एकमेकांना ते डेट करीत होते. या दोघांची ओळख कामाच्या निमित्ताने झाली होती.आर्यने काही पंजाबी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले असून सध्या तो एक टीव्ही मालिका करत आहे. तर जास्मिन ही प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करते. आर्य हा राज बब्बर यांचा मोठा मुलगा आहे. लग्नानंतर आर्य बब्बरने त्याच्या पत्नीसोबतचा फोटो ट्विट केले आहे. या दोघांचा विवाह पंजाबी पद्धतीने साजरा झाला.