Join us  

दुस-यांदा प्रेग्नंट आहे सलमानची बहीण, पुन्हा एकदा मामू बनणार भाईजान!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:25 PM

सलमान खान पुन्हा एकदा मामा बनणार आहे. होय, सलमान खानची बहीण अर्पिता खान दुस-यांदा प्रेग्नंट असल्याचे कळतेय. चार वर्षांपूर्वी अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले होते.  

ठळक मुद्देअर्पिता खान ही सलीम खान आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे.

सलमान खान पुन्हा एकदा मामा बनणार आहे. होय, सलमान खानची बहीण अर्पिता खान दुस-यांदा प्रेग्नंट असल्याचे कळतेय. चार वर्षांपूर्वी अर्पिताने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले होते.  2016 मध्ये अर्पिताने पहिल्या अपत्याला जन्म दिला. आता अर्पिता दुस/यांदा आई होणार आहे.मुंबई मिररने याबद्दलचे वृत्त दिले आहे. अर्थात या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. अर्पिताचा मुलगा आहिल हा सलमानचा जीव की प्राण आहे. सलमान खान बहीण अर्पिता खानवर जितके प्रेम करतो, त्याच्या कैकपट प्रेम अर्पिताचा मुलगा अहिलवर करतो.

होय, या मामा-भाच्याच्या जोडीचे प्रेम चाहत्यांनी अनेकदा पाहिले आहे. मामा बनल्यापासून सलमान वेळात वेळ काढून भाचा अहिलसोबत मजा-मस्ती करत असतो. आहिलसोबत खेळतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ सलमान शेअर करत असतो. आता सलमान पुन्हा एकदा मामू बनणार आहे. साहजिकच तो सुपरएक्ससाईटेड आहे.अर्पिता खान ही सलीम खान आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे.

अर्पिता खानने २०१४ साली हिमाचल प्रदेशच्या आयुष शर्मा याच्याशी प्रेम विवाह केला होता. सलमानने अगदी थाटामात आपल्या बहिणीचे  लग्न लावले होते. गतवर्षी ‘लव्हयात्री’ या चित्रपटाद्वारे अर्पिताचा पती आयुषने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

 आयुषचा डेब्यू अगदी वाजत-गाजत झाला. आयुषचे लॉन्चिंग ग्रॅण्ड व्हावे, यासाठी अख्खे खान कुटुंब झटले. खुद्द सलमान खानने आयुषच्या लॉन्चिंगचा जिम्मा आपल्या खांद्यावर घेतला. पण दुदैवाने आयुषचा डेब्यू फसला. बॉक्सआॅफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. लवकरच आयुषला तिसरा चित्रपटही मिळाला आहे. लवकरच तो दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्या एका चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :सलमान खानआयुष शर्मा