Join us  

काश्मीरमधील सैन्यानं फायरिंग रेंजला दिलं विद्या बालनचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 8:36 PM

भारतीय सैन्याने काश्मीरच्या गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला विद्या बालनचे नाव दिले आहे. आता ही फायरिंग रेंज 'विद्या बालन फायरिंग रेंज' म्हणून ओळखली जाणार आहे.

बॉलिवूडची उलाला गर्ल म्हणजेच अभिनेत्री विद्या बालनने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. साचेबद्ध काम न करता तिने विविध भूमिका साकारल्या. आता विद्या बालनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ऑस्कर समितीची सदस्य झाल्यानंतर आता विद्या बालनचे नाव गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला देण्यात आले आहे.

भारतीय सैन्याने काश्मीरमधील गुलमर्ग येथील फायरिंग रेंजला विद्या बालनचे नाव दिले आहे. आता ही फायरिंग रेंज 'विद्या बालन फायरिंग रेंज' म्हणून ओळखली जाणार आहे. यापूर्वी या रेंजला कोणतेही नाव नव्हते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विद्या बालनने काश्मीरमधील ‘गुलमर्ग विंटर फेस्टिव्हल’मध्ये तिचा नवरा सिद्धार्थ रॉय कपूर सोबत हजेरी लावली होती.

धाडसी, सामाजिक मुद्द्यांच्या विचारसरणीच्या, स्वतंत्र आणि स्वावलंबी स्त्रियांची प्रतिमा दाखवून पडद्यावर आपली छाप उमटवणार्‍या अभिनेत्रीच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याने विद्या बालनच्या नावाने फायरिंग रेंजचे नाव देण्याचे ठरवले.

विद्या बालनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर नुकताच तिचा शेरनी हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर रिलीज करण्यात आला. या चित्रपटात विद्याने महिला वन अधिकारीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :विद्या बालनभारतीय जवान