Join us  

Ex गर्लफ्रेंडला पैसे देण्यासाठी अरमान कोहलीवर आली कुटुंबाचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ, वकिल म्हणाले- त्याची परिस्थिती अत्यंत बिकट...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:48 AM

अरमानची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने 5 वर्षांपूर्वी अरमानवर मारहाणीचा आरोप केला होता. तिला पैसे देण्यासाठी अरमानकडे पैसे नव्हते.

बॉलिवूड अभिनेता अरमान कोहलीने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने  दाखल केलेला खटला आता निकाली निघाला आहे. अरमानची एक्स गर्लफ्रेंड नीरू रंधावाने 5 वर्षांपूर्वी अरमानवर मारहाणीचा आरोप केला होता. तिच्या म्हणण्यानुसार, अरमानने तिचा छळ केला आणि तिचे शारीरिक शोषण केले.  आता दोघांनी हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आला आहे.

जून २०१८मध्ये अरमानविरोधात नीरू रंधावाने पोलिसांत तक्रार केली होती. त्यानंतर अरमानला पोलिसांकडून अटकही करण्यात आली होती. नीरू रंधावाने तक्रार मागे घेतल्यानंतर कोर्टाने एक कोटी देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा अरमानने नीरू रंधावाला ५० लाख रुपये देत उर्वरित ५० लाखांचा चेक दिला होता. परंतु, तो चेक बाऊन्स झाल्याने पुन्हा नीरू रंधावाने न्यायालयात धाव घेतली होती. 

यानंतर, अरमान कोहलीच्या बाजूने सांगण्यात आले की त्याने आपल्या कुटुंबाचे दागिने गहाण ठेवले आहेत, त्यानंतरही तो फक्त 30 लाख रुपयेच देऊ शकले. कोहलीचे वकील सय्यद यांनी न्यायालयाला सांगितले की कोहलीची परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि त्याला त्याच्या कुटुंबाचे दागिने गहाण ठेवावे लागले आणि तरीही त्याला फक्त 30 लाख रुपये मिळाले. यानंतर रंधावाने ५० लाखांऐवजी केवळ ३० लाख रुपये घेण्याचे मान्य केले आणि त्यामुळे हे प्रकरण बंद झाले. 

अरमान कोहली आणि नीरू रंधावा २०१५ साली एका कॉमन फ्रेंडद्वारे पहिल्यांदा भेटले होते. 'प्रेम रतन धन पायो' या चित्रपटात काम करण्यासाठी नीरूने अरमान कोहलीला ऑफर दिली होती. "मी मुंबईत कोणालाच ओळखत नव्हते. त्यामुळे मी अरमानच्या घरी राहत होते. त्यादरम्यान आमच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. आम्ही एकमेकांना भेटायचो. पण, शारीरिक हिंसेमुळे आमच्या नात्यात दुरावा आला होता. एकदा त्याने मला मारहाण केल्यानंतर मला रुग्णालयात भरती व्हावं लागलं होतं," असंही नीरू रंधावाने सांगितलं. 

टॅग्स :अरमान कोहली