Join us  

अरमान जैनच्या रिसेप्शनमध्ये मलायका अरोरा व अर्जुन कपूर दिसले रोमँटिक अंदाजात, See Video

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 1:10 PM

मलायका अरोरा व अर्जुन कपूर अरमान जैन व अनीसा मल्होत्रा यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पहायला मिळाले.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरमलायका अरोरा यांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचे जगजाहीर केले आहे. त्यानंतर आता ते ही फेज खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर ते दोघे फोटोंमुळे व रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असतात. नुकतेच त्या दोघांनी अरमान जैन व अनीसा मल्होत्रा यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी ते दोघे रोमँटिक अंदाजात दिसले.

अर्जुन कपूरमलायका अरोरा यांचा या रिसेप्शन पार्टीतील गेटअपमध्ये खूप छान दिसत होते. दोघांनी कॉन्ट्रास्ट रंगाचे आऊटफिट परिधान केले होते. या पार्टीतील त्या दोघांचे हातात हात घालून फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अर्जुन कपूर ग्रीन शेरवानीमध्ये दिसला तर मलायकाने लाल रंगाची साडी परिधान केली होती. त्यात ती खूपच हॉट दिसत होती. 

अर्जुन कपूर व मलायका एकमेकांना बऱ्याच कालावधीपासून डेट करत आहेत. असं बोललं जातंय की ते दोघं लवकरच लग्न करू शकतात. अरबाज खान सोबत विभक्त झाल्यानंतर मलायका व अर्जुन एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र बराच काळ त्या दोघांनी चुप्पी साधली होती. मात्र या वर्षाच्या सुरूवातीला दोघांनी ते रिलेशनशीपमध्ये असल्याचे जगजाहीर केले.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर अर्जुन कपूर लवकरच रकुल प्रीतसोबत एका चित्रपटात दिसणार आहे.

मलायका रुपेरी पडद्यापासून दूर असली तर टेलिव्हिजनवरील काही शोजमध्ये दिसते.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर