Join us  

अर्जुन रामपालच्या मेहुण्याला या गुन्ह्यामध्ये झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 12:06 PM

डॅडी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अर्जुन रामपाल सध्या चांगलाच खूश आहे. अर्जुनने डॅडी या चित्रपटात साकारलेली अरुण गवळीची ...

डॅडी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे अर्जुन रामपाल सध्या चांगलाच खूश आहे. अर्जुनने डॅडी या चित्रपटात साकारलेली अरुण गवळीची भूमिका चांगलीच गाजली असून त्याचे प्रेक्षक, समीक्षक सगळेच कौतुक करत असल्याने तो प्रचंड खूश आहे. पण तुम्हाला माहीत आहे का अर्जुन सध्या एका संकटात चांगलाच सापडलेला आहे. कारण त्याच्या मेहुण्याला पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. अमितचा मेहुणा अजित गिलला पोलिसांना भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यावर सट्टा लावल्याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. अर्जुन रामपाल हेच केवळ अमित गिल बॉलिवूडसोबतचे कनेक्शन नाही तर अमितने देखील स्वतः अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे काही चित्रपट प्रदर्शित देखील झाले असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई क्राईम ब्रान्चने क्रिकेट बेटिंग रॅकेटचा नुकताच पर्दाफाश केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट सामन्याच्या वेळी सट्टेबाजी केल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच सहा जणांना अटक केली आहे. या रॅकेटमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा मेहुणा अमित गिलचा समावेश आहे.मुंबई पोलिस आयुक्तांनी सटोरिया म्हणजेच सट्टा लावणारे आणि पंटर म्हणजेच सट्टा खेळणाऱ्यांवरही कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्या अंतर्गतच अमित अजित गिलविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अमितच्या अटकेनंतर त्याचा भावोजी अर्जुन रामपाल यांची देखील चौकशी होऊ शकते असे म्हटले जात आहे.मागील एका महिन्यापासून मुंबईत सट्टेबाजांविरोधात सातत्याने कारवाई सुरू आहे. गेल्या आठवड्यात ठाणे आणि भांडुपमध्ये अनेक बुकींना पकडण्यात आले होते. मागच्या महिन्यात वांद्रे क्राईम ब्रान्चनेही सहा सट्टेबाजांना अटक केली होती. अर्जुन रामपालचा मेहुणा अमित गिल हा इतर सहा आरोपींच्या सतत संपर्कात होता, असे म्हटले जात आहे.अर्जुन रामपालने या सगळ्यावर मौन राखणेच पसंत केले आहे. अमित गिल बद्दल देखील त्याच्या कडून काहीही सांगण्यात आलेले नाही. अर्जुन या सगळ्यावर प्रतिक्रिया कधी देतो याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. Also Read : ‘बायोपिकचा प्रवास होता खडतर’-अर्जुन रामपाल