अर्जुन रामपाल ने फॅन्ससोबत शेअर केली 'ही' गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 15:38 IST
अर्जुन रामपलाचे लगातार 2 दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याने तो नाराज होता. मात्र नुकत्याचे त्यांना त्याच्या फॅन्सबरोबर एक ...
अर्जुन रामपाल ने फॅन्ससोबत शेअर केली 'ही' गुडन्यूज
अर्जुन रामपलाचे लगातार 2 दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाल्याने तो नाराज होता. मात्र नुकत्याचे त्यांना त्याच्या फॅन्सबरोबर एक गुडन्यूज शेअर केली आहे. अर्जुनने ट्वीट करुन आईचा ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याचे सांगितले आहे. अर्जुन रामपालच्या आईवर गेल्या काही दिवसांपासून ब्रेस्ट कॅन्सरसाठीचे उपचार चालू होते. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत अर्जुनने ट्वीट करुन आई पूर्णपणे बरी झाल्याचे आपल्या फॅन्सना सांगितले. आईचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला आहे आता तिची प्रकृती ठिक असल्याचे अर्जुनने ट्वीट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आईसोबत लिस्बनमध्ये आहे. अर्जुनच्या आईची कॅन्सरची ट्रीटमेंट लिस्बनमध्ये चालू होती. त्यामुळे अर्जुनही आईसोबत तिथेच आहे. अर्जुन आईचे उपचार सुरु असताना मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. अर्जुनने ट्विटरवरुन प्रोफेसर कार्लो ग्रेको आणि चेम्पलीमड क्लिनिक सेंटरचे पण आभार मानले आहेत. या क्लिनिक सेंटरमध्ये अर्जुनच्या आईवर उपचार सुरु होते. या सगळ्यांबरोबरच ललित मोदीला देखील त्यांने धन्यावाद केले आहेत. ललित मोदीच्या मदतीमुळे हे सर्व शक्य झाल्याचे अर्जुन म्हणाला आहे. ललित मोदीवर झालेल्या आय पी एल मॅच फिक्सिगच्या आरोपांमुळे तो देशाच्या बाहेर आहे. अर्जुन कपूरची गतवर्षी रॉक ऑन 2 आणि काहानी 2 हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. हे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले. आगामी डॅडी चित्रपटात तो गँगस्टर अरुण गवळीची भूमिका साकारणार आहे. त्याच बरोबर तो बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासबोत आँखे च्या सीक्वलमध्ये सुद्धा दिसणार आहे.