Join us  

तुझी खूप आठवण येते, आई परत ये ना...! आईच्या आठवणीत अर्जुन कपूरची काळीज चिरणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 11:18 AM

 बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज आईच्या आठवणीने व्याकूळ झाला. सोशल मीडियावर त्याने अतिशय भावूक पोस्ट शेअर केली. 

ठळक मुद्देअर्जुन आपल्या आईच्या अतिशय जवळ होता.आईच्या निधनानंतर तिच्या आठवणीत त्याने आपल्या हातावर ‘माँ’ असा टॅटू गोंदवला आहे.

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आज आईच्या आठवणीने व्याकूळ झाला. 9 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी अर्जुनची आई मोना शौरी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता. आज आईच्या पुण्यतिथीला अर्जुनचा जणू बांध फुटला. त्याने सोशल मीडियावर अतिशय भावूक पोस्ट शेअर केली. अर्जुनने इन्स्टाग्रामवर आईचा एक हसरा फोटो शेअर केला. या फोटोसोबत अर्जुने असे काही लिहिले की, वाचणा-याचे काळीज फाटून जाईल. आई, प्लीज परत ये ना..., अशी आर्त साद त्याने घातली.

‘9 वर्षे झालीत. हे चूक आहे. मला तुझी खूप आठवण येते आई. आई प्लीज परत ये ना... तुझी माझ्याबद्दलची चिंता, माझी काळजी सगळे काही मी मिस करतो. मी मिस करतो, माझ्या फोनवर तुझे लाव. जेव्हा तू मला फोन करायचीस. मी मिस करतो घरी येऊन तुझा तो चेहरा. तुझ्या चेह-यावरचे ते हास्य, तुझा तो सुगंध मी मिस करतो. अर्जुन म्हणून मारलेली तुझी हाक मी मिस करतो. तुझा आवाज आजही माझ्या कानात घुमतो.... तू जिथे असशील तिथे आनंदी असशील, अशी आशा करतो. मी ठीक राहण्याचा प्रयत्न करतो. अनेक दिवस काढतो, पण तुझी आठवण छळते... आई परत ये ना गं...,’ असे अर्जुनने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

अर्जुन आपल्या आईच्या अतिशय जवळ होता.आईच्या निधनानंतर तिच्या आठवणीत त्याने आपल्या हातावर ‘माँ’ असा टॅटू गोंदवला आहे. अर्जुन 11 वर्षांचा असताना अर्जुनचे वडील बोनी कपूर यांनी श्रीदेवीशी दुसरे लग्न केले होते. अर्जुनवर याचा मोठा परिणाम झाला. इतका की,आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर मी कधीच लग्न करणार नाही, हे अर्जुनने ठरवून टाकले होते. पण या कटू आठवणीत पुसून टाकल्या आहेत. आईची आठवण मात्र त्याला अजूनही कासावीस करते.

टॅग्स :अर्जुन कपूर