Join us  

गायक अरजित सिंहने एक नाही तर चार फ्लॅट केले खरेदी, इतक्या कोटींच्या घरात आहे त्याची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:59 AM

Arjit Singh's Flat Price : अरिजीत सिंहच्या करियरला केवळ 14-15 वर्षं झाली असली तरी त्याची हिट गाण्यांची यादी खूप मोठी आहे.

आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते. कलाकारांचे बंगले, फार्महाऊस याबाबत फॅन्सच्या मनात कुतूहल असतं. याच यादीत गायक अरजित सिंहचे नाव सामिल झाले आहे.

सुरुवातीपासूनच अरजित सिंहने आपल्या गायकीने रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.  दिवसेंदविस यशाच्या पायरी चढत असताना अरजितने मुंबईत त्याची स्वप्नपूर्ती ही केली आहे. अरजित फक्त त्याच्या गाण्यांमुळे जास्त चर्चेत असतो. आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. मुंबईत प्रत्येकालाच आपल्या स्वप्नाचं घर असावे अशी इच्छा असते. जिथे एक घर घेता घेता नाकी नऊ येते. तिथे अजरितने मात्र मुंबईतील सात बंगलो येथे एका बिल्डींगमध्ये एक नाही तर चार फ्लॅट खरेदी केले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार अरिजीतनं खरेदी केलेल्या पहिल्या फ्लॅटची किंमत १.८० कोटी तर इतर तीन फ्लॅटची किंमत ही २.२०, २.६० आणि २.५० आहे. २२ जानेवारी २०२० ला हे फ्लॅट खरेदी केल्याची नोंद आहे. त्यानुसार अरजितने तब्बल चारही फ्लॅटसाठी जवळपास ९ कोटी रुपये मोजले आहेत.  अरिजीत सिंहच्या करियरला केवळ 14-15 वर्षं झाली असली तरी त्याची हिट गाण्यांची यादी खूप मोठी आहे. 2005 मध्ये त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. खूपच कमी वेळात त्याने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे.

 

आज तर त्याच्या आवाजाचे अनेक फॅन आहेत. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी त्याला सिनेमात गाण्याची संधी दिली. 'सावरियाँ' या सिनेमातील एक गाणे त्याने गायले होते. पण काही कारणास्तव हे प्रदर्शित झाले नाही. पण यानंतर त्याला कामे मिळत गेली. आज अरजितने एक गायक, संगीतकार म्हणून आपली एक ओळख निर्माण केली आहे. त्याने हिंदीप्रमाणे अनेक प्रादेशिक भाषेत देखील गाणी गायली आहेत. 

टॅग्स :अरिजीत सिंह