अरबाज करणार दुहेरी भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 22:02 IST
मलायकासोबत असलेल्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर अरबाज आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू लागला असल्याचे दिसते. नुकताच फ्रि की अली ...
अरबाज करणार दुहेरी भूमिका
मलायकासोबत असलेल्या नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर अरबाज आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करू लागला असल्याचे दिसते. नुकताच फ्रि की अली या चित्रपटात दिसल्यावर त्याने आणखी एका चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात करणार आहे. दिग्दर्शक चंद्रकांत सिंह यांच्या आगामी चित्रपटात अरबाज खान दुहेरी भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय. हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असून यात तो एका मध्यवयीन बिझनेसमॅनच्या भूमिकेत दिसेल. आपल्याहून वयाने लहान असलेल्या एका मुलीशी विवाह त्याचा विवाह होतो. मात्र काही दिवसातच या दिग्ग्ज उद्योगपतीची हत्या होते. हा या चित्रपटाचा टर्निंग पार्इंट असल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटाची शूटिंग लवकर सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अरबाज पुन्हा चित्रपटात व्यस्त होणार असल्याचे दिसतेय. सोहेल खान दिग्दर्शित फ्रिकी अली चित्रपटात त्याने मसूदची भूमिका केली होती. मात्र चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला नसल्याने त्याच्या कामाचा फारसा उल्लेख झाला नाही. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी खान भावंडांनी कोणतिही कसर सोडली नव्हती. मात्र याचा फारसा परिणाम दिसला नाही.आता पुन्हा अरबाज नव्या दमाने चित्रपटांमध्ये काम करू पाहतोय असेच दिसतेय. विशेष म्हणजे चंद्रकांत सिंग यांनी दुहेरी भूमिका दिली असल्याने त्याची भूमिका या चित्रपटात महत्त्वाची असेलच यात शंकाच नाही. या सोबतच दंबग 3 ची देखील चर्चा सुरू असल्याने त्यात सलमानचा भावाची भूमिका तो साकारलेच यात दुमत नाही. दबंग सिरीजच्या दोन्ही चित्रपटात अरबाजचा ‘की रोल’ होता.