Join us  

मलायकासोबतच्या घटस्फोटाबाबत अरबाजने केला खुलासा, म्हणाला की, सर्वकाही ठीक होते पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 2:39 PM

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने मलायकासोबत केलेल्या घटस्फोटाबाबत खुलासा केला आहे. अरबाज म्हणाला की, घटस्फोट घेण्याबाबत खूप विचार केला आणि त्यानंतरच निर्णय घेतला.

अभिनेता अरबाज खानमलायका अरोराने २०१७ साली वीस वर्षाचे नाते संपुष्ठात आणले होते. दोघे विभक्त झाल्यानंतर बऱ्याच चर्चांना उधाण आले होते. नुकतेच अरबाजने त्यांच्या नात्यात दुरावा का आल्याचे सांगितले.

अरबाज म्हणाला की, सर्व काही ठिक होते पण तरीदेखील आमचे लग्न तुटले. जर दोन लोकांमध्ये काही गोष्टींमध्ये जमत नसेल तर त्याचे निर्णय त्यांनीच घेतले पाहिजे. 

अरबाज पुढे म्हणाला की, घटस्फोट घेण्यापू्र्वी आम्ही बराच विचार केला. त्याचे फायदे व तोट्यांचाही विचार केला. त्यानंतरच आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून आम्ही दोघेही चांगले व्यक्ती बनू शकू. आम्ही अशा परिस्थितीत होतो ज्यात आम्ही एकमेकांना खूप त्रास देत होतो. ज्याचा परिणाम आमच्या जवळच्या लोकांवर होत होता. 

मलायकाने घटस्फोटाबद्दल सांगितले होते की, घटस्फोटानंतर माझ्या डोक्यात बऱ्याच गोष्टी सुरू होत्या.अशा परिस्थितीत कोणीही असाच विचार करेल की आता काय होईल? आता जीवनात पुढे काय घडेल? 

विभक्त झाल्यानंतर मलायका म्हणाली होती की, आता ती खूप चांगले जीवन व्यतित करते आहे. सुरूवातीला खूप तणावाखाली जगत होते. पण घटस्फोट घेतल्याचा अजिबात पश्चाताप होत नाही.

मलायका व अरबाज विभक्त झाल्यानंतर आता त्यांच्या जीवनात ते खूश आहेत.

अरबाज जॉर्जिया एंड्रियानीला डेट करत आहेत तर मलायकाचे अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशन असल्याचे बोलले जात आहे. मात्र दोघांनीही अद्याप आपल्या या नात्याबद्दल खुलासा केलेला नाही.

टॅग्स :अरबाज खानमलायका अरोरा