Join us  

SEE PICS : गर्लफ्रेन्ड येलोसोबत फॅमिली फंक्शनमध्ये पोहोचला अरबाज खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 9:46 AM

मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अरबाज खान सर्रास कथित गर्लफ्रेन्ड येलो मेहरा हिच्यासोबत फिरताना दिसतोय. आता तर फॅमिली फंक्शनमध्येही येलो अरबाजसोबत दिसू लागली आहे.

मलायका अरोराशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेता अरबाज खान सर्रास कथित गर्लफ्रेन्ड येलो मेहरा हिच्यासोबत फिरताना दिसतोय. आता तर फॅमिली फंक्शनमध्येही येलो अरबाजसोबत दिसू लागली आहे. होय, गत ८ जुलैला अरबाजचा जावर्ई अतुल अग्निहोत्री याचा वाढदिवस होता. 

या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अरबाज येलोसोबत दिसतोय. (अतुल हा अरबाजची बहीण अलविराचा पती आहे.) एकंदर काय तर अरबाज व यॅलोच्या नात्याला घरच्यांनीही संमती दिल्याचे दिसतेय.

या फोटोंत अरबाज व येलो प्रचंड आनंदी दिसताहेत. दोघेही मस्ती मूडमध्ये आहेत. पार्टीत सलमानची आई सलमा खान, हेलन, वडिल सलीम खान असे सगळेच पोहोचले. 

अतुल सलमा यांचा हात धरून त्यांना गाडीपर्यंत पोहोचवत असल्याचेही फोटोमध्ये दिसतेय. अर्थात सलमान खान मात्र या पार्टीत नव्हता.

 घटस्फोट झाल्यानंतर अरबाज आणि मलाइका आपआपल्या आयुष्यात पुढे जाण्याची धडपड करीत आहेत. अशात अरबाज नव्या प्रेमाच्या शोधात असून, तो सातत्याने येलोसोबत बघावयास मिळत आहे. ३ जानेवारी रोजीही तो एका रेस्टॉरंटमध्ये या मिस्ट्री गर्लसोबत स्पॉट झाला  होता. वास्तविक हे दोघे रेस्टॉरंटबाहेर एका पाठोपाठ आले. अगोदर अरबाज बाहेर आला. त्यानंतर काही वेळातच त्याची ही मिस्ट्री गर्ल आली. विशेष म्हणजे तेथून हे दोघे वेगवेगळ्या वाहनांनी त्यांच्या मार्गावर परतले  होते. दरम्यान, अरबाज खान सध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात सुपरस्टार सलमान खान प्रमुख भूमिकेत बघावयास मिळणार आहे. मात्र चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचे नाव अद्यापपर्यंत निश्चित झाले नाही. चित्रपटात टीव्ही अभिनेत्री मौनी राय गेस्ट अपीयरंज देताना बघावयास मिळू शकते.

टॅग्स :अरबाज खान