Join us

ए.आर. रहमानच्या आयुष्यावर बायोपिक तयार करण्याचा विचार करतोय 'हा' दिग्दर्शक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 12:50 IST

सध्या हॉलिवूड मध्ये  बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत अभिनेत्यांपासून ते खेळाडूंपर्यंत सगळ्यांचे बायोपिक आपल्या भेटीस आले आहेत. मास्टर ब्लास्टर ...

सध्या हॉलिवूड मध्ये  बायोपिकचा ट्रेंड सुरु आहे. आतापर्यंत अभिनेत्यांपासून ते खेळाडूंपर्यंत सगळ्यांचे बायोपिक आपल्या भेटीस आले आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंग धोनी. मेरी कॉम, मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आजपर्यंत रसिकांच्या भेटीला आले आहेत. मात्र अजून कोणत्याही संगीतकारच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्यात आलेला नाही. कदाचित आता ऑस्कर विजेता ए. आर. रहमान यांच्या चित्रपट करण्यात येई शकतो. रहमानसोबत तमाशा, रॉकस्टर आणि हायवे सारख्या चित्रपट काम केलेल्या निर्माता इम्तियाज अलीचे म्हणणे आहे रहमानच्या आयुष्यावर चित्रपट नक्कीच तयार केला गेला पाहिजे फक्त तो तयार करण्याची ही योग्य वेळ नाही.  नुकताचा झालेल्या  "वन हार्ट: ए आर रहमान कॅन्सर्ट फिल्म" च्या प्रीमियरला इम्तियाजने हजेरी लावली होती.  त्यावेळी त्याला विचारण्यात आले की रहमानवर बायोपिक तयार करण्यात यावा याबाबत तुझे काय मत आहे. इम्तियाज म्हणला,  हो नक्कीच  ए आर रहमानवर बायोपिक तायर करण्यात आला पाहिजे.  पण त्याची अजून योग्य वेळ आली नाही कारण रहमानला अजून भरपूर काही साध्य करायचे आहे. त्याला त्याच्या करिअरचे शिखर गाठायचे आहे.  ALSO READ : IIFA 2017 : ए. आर. रहमानच्या ‘उर्वशी-उर्वशी’ला वन्समोर!!इम्तिआजला त्याच्या भविष्यातील प्रोजेक्टबद्दल विचारले असता तो म्हणाला की ,"मी कथा लिहितो आहे त्यावर काम सुरू आहे, मी अशीच कथा निवडतो ज्याला मी योग्य न्याय देऊ शकतो.'' आता हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे की इंडस्ट्रीत 25 वर्ष पूर्ण झालेल्या रहमानवर बायोपिक बनवण्याचा इम्तियाज अलीचा विचार कितपत यशस्वी ठरतो.