Join us

​राहत्या सोसायटीत अनुष्का शर्माची ‘दबंगगिरी’; शेजा-याची बीएमसीत तक्रार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 11:15 IST

अनुष्का शर्मा ज्या बिल्डिंगमध्ये राहते, तिथे तिचीच ‘दबंगगिरी’ चालते. अर्थात हे आम्ही नाही, तर अनुष्काचे शेजारी म्हणताहेत. अनुष्काचे शेजारी ...

अनुष्का शर्मा ज्या बिल्डिंगमध्ये राहते, तिथे तिचीच ‘दबंगगिरी’ चालते. अर्थात हे आम्ही नाही, तर अनुष्काचे शेजारी म्हणताहेत. अनुष्काचे शेजारी सुनील बत्रा यांची अशी तक्रार आहे.अनुष्काने आपल्या घराचे इलेक्ट्रिक जंक्शन अर्थात मीटर बॉक्स फ्लोरच्या पॅसेज एरियामध्ये बनवले आहे. जे बेकायदेशीर आहे. बत्रा यांनी यासंदर्भात बीएमसीकडे तक्रार दाखल केली आहे. अनुष्काने सोसायटीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप बत्रा यांनी केला आहे. बत्रा या सोसायटीच्या १६ व्या आणि १७ व्या फ्लोरचे मालक आहेत. मुंबईच्या वर्सोवा भागात ‘बद्रीनाथ टॉवर’ आहे. या टॉवरच्या २० व्या माळ्यावर अनुष्का आपल्या कुटुंबासोबत राहते. केवळ मीटरच नाही तर एसी सुद्धा अनुष्काने चुकीच्या जागी फीट केले असल्याचा बत्रा यांचा आरोप आहे. त्यामुळे दिवसभर एसीचे पाणी भींतीवर सांडते. यामुळे एका भींतीला तडा गेला आहे. बत्रा यांच्या मते, सोसायटीचे सर्व सदस्य अनुष्काविरोधात बोलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी थेट बीएमसीकडे तक्रार केली. दरम्यान बत्रा यांच्या तक्रारीची बीएमसीने गंभीर दखल घेतली असून अनुष्काला नोटीस जारी केले आहे. यात इलेक्ट्रिक जंक्शन बॉक्स ताबडतोब पॅसेज एरियामधून हटविण्याचे निर्देश देण्यात आले आहे. गत ६ एप्रिलला हे नोटीस जारी करण्यात आले आहे. ALSO READ : शाहरूख खान- अनुष्का शर्माच्या सिनेमाचा फोटो लीक!यासंदर्भात अनुष्काशी संपर्क होऊ शकला नाही. पण तिच्या प्रवक्त्याने बत्रा यांच्या आरोपांचे खंडन केले. इलेक्ट्रिक बॉक्स सर्व नियमांचे पालन करून आणि आवश्यक ती परवानगी घेऊनच बसवण्यात आल्याचे या प्रवक्त्याने म्हटले आहे. आता अनुष्का या सगळ्या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देते ते पाहूच!