Join us  

वाचा! संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात झळकण्याविषयी काय सांगितले अनुष्का शर्माने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 1:19 PM

अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांची जोडी पहिल्यांदाच सुल्तान या चित्रपटाच्या निमित्ताने झळकली आणि ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली देखील होती. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा चित्रपटात रंगली होती.

ठळक मुद्देअनुष्का भन्साळी यांच्या चित्रपटात अनुष्का झळकणार नसल्याचे तिच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सलमान आणि अनुष्काच्या फॅन्सची निराशा होणार यात काहीच शंका नाही.अनुष्काने अद्याप तरी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत कोणताच करार केलेला नाहीये. अनुष्काला संजय लीला भन्साळी यांच्यासोबत नक्कीच काम करायला आवडेल. पण अद्याप तिला कोणत्याही चित्रपटाबाबत विचारण्यात आलेले नाही. भविष्यात त्यांच्यासोबत काम करायला ती उत्सुक आहे. 

बॉलिवूडमध्ये एकदा एक जोडी प्रसिद्ध झाली की, त्या जोडीचे चित्रपट वारंवार प्रेक्षकांना पाहायला आवडतात. काजोल-शाहरुख, सलमान-कॅटरिना यांसारख्या जोड्या प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. सुल्तान या चित्रपटात प्रेक्षकांना एक नवी जोडी पाहायला मिळाली होती आणि ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

अनुष्का शर्मा आणि सलमान खान यांची जोडी पहिल्यांदाच सुल्तान या चित्रपटाच्या निमित्ताने झळकली आणि ही जोडी प्रेक्षकांना भावली होती. या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा चित्रपटात रंगली होती. त्यामुळे या चित्रपटानंतर ते दोघे एकत्र कधी झळकणार, कोणत्या चित्रपटात काम करणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. अनुष्का आणि सलमान संजय लीला भन्साळीच्या आगामी चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. पण अनुष्का भन्साळी यांच्या चित्रपटात झळकणार नसल्याचे तिच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सलमान आणि अनुष्काच्या फॅन्सची निराशा होणार यात काहीच शंका नाही.

अनुष्काच्या प्रववत्यांनी याविषयी मीडियाशी बोलताना सांगितले आहे की, अनुष्काने अद्याप तरी संजय लीला भन्साळी यांच्यासोबत कोणताच करार केलेला नाहीये. अनुष्काला संजय लीला भन्साळी यांच्यासोबत नक्कीच काम करायला आवडेल. पण अद्याप तिला कोणत्याही चित्रपटाबाबत विचारण्यात आलेले नाही. भविष्यात त्यांच्यासोबत काम करायला ती उत्सुक आहे. 

अनुष्का शर्माचा झिरो हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आनंद एल रायच्या चित्रपटात शाहरुख खान, कतरिना कैफ देखील अनुष्कासोबत मुख्य भूमिकेत आहेत. हे तिघे प्रेक्षकांना झिरो या चित्रपटात एकत्र पाहायला मिळाले होते. त्यांची हीच जादू प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.

संजय लीला भन्साळी लवकरच एका चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची चर्चा असली तरी या चित्रपटाची कथा काय असणार, या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार याबाबत मौन राखणेच संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या टीमने पसंत केले आहे. संजय लीला भन्साळी आणि सलमान खान यांनी आजवर खामोशी, हम दिल दे चुके सनम यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. 

 

टॅग्स :अनुष्का शर्मासलमान खानसंजय लीला भन्साळी