Join us  

लग्नानंतर अनुष्का शर्मा लागली कामाला, हा घ्या पुरावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2018 9:26 AM

विराट सोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अनुष्का शर्माने कामाला सुरुवात केली आहे. तिने तिचा आगामी चित्रपट सुई धागाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यात तिच्यासोबत वरुण धवन ही दिसणार आहे.

विराट सोबत लग्नाच्या बेडीत अडकल्यानंतर अनुष्का शर्माने कामाला सुरुवात केली आहे. तिने तिचा आगामी चित्रपट सुई धागाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. यात तिच्यासोबत वरुण धवन ही दिसणार आहे. काही वेळा पूर्वी अनुष्काने या चित्रपटातील फोटो सोशल  मीडियावर शेअर केला आहे. ज्यात ती शिलाई काम करताना दिसते आहे. या फोटोसोबत अनुष्काने कॅप्शन सुद्धा लिहिले आहे. ''कतरन से बुनी कहानी पैबंद लगा के है सुनानी.''  पहिल्यांदा अनुष्का आणि वरुण एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटात वरुण टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. यात अनुष्का कोणती भूमिका साकारणार हे अद्याप कळू शकलेले नाही.  या चित्रपटाचे दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहे. तर मनीष शर्मा या चित्रपटाचे प्रोड्यूसर आहेत. यापूर्वी ‘दम लगाके हईशा’मध्ये मनीष व शरत यांच्या टीमने एकत्र काम केले होते. यश राज बॅनरखाली तयार होणार हा चित्रपट गांधी जयंतीच्या आधी चित्रपटातगृहात प्रदर्शित होणार आहे म्हणजेच 28 सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मेड इन इंडिया’च्या आयडॉलॉजीवर आधारित या चित्रपटात एक नवी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. ALSO READ :  अनुष्का शर्माच्या ‘परी’च्या टीजरने उडविला थरकाप; तर पोस्टर बघून फुटेल घाम!या चित्रपटासह अनुष्काच्या खात्यात अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. अनुष्का शर्माच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या परी चित्रपटात ती दिसणार आहे. हा एक सुपरनॅचुरल थ्रिलर असणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय  आनंद एल रॉय यांच्या आगामी चित्रपट हिरोमध्ये ही ती शाहरुख खान आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला अनुष्काने आधीच सुरुवात केली आहे. यात शाहरुख एका  बुटक्या व्यक्तिची भूमिका साकारताना दिसणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची  व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.