Join us  

हातात बॅट घेतली म्हणून..., ‘चकदा एक्स्प्रेस’च्या सेटवरचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी उडवली अनुष्का शर्माची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 4:19 PM

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या ‘चकदा एक्स्प्रेस’ (Chakda Xpress) या चित्रपटात बिझी आहे. या सेटवरचे काही फोटो लीक झालेत आणि हे फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सनी अनुष्काची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या ‘चकदा एक्स्प्रेस’ (Chakda Xpress) या चित्रपटात बिझी आहे. सध्या हावडा, कोलकाता येथे या चित्रपटाचं शूटींग सुरू आहे. या सेटवरचे काही फोटो लीक झालेत आणि हे फोटो पाहून सोशल मीडिया युजर्सनी अनुष्काची खिल्ली उडवायला सुरूवात केली.‘ही कुठल्याही अँगलने झुलन दिसत नाही,’अशी कमेंट एका युजरने केली. ‘हातात बॅट घेतल्याने कोणी झुलन बनत नाही,’अशी कमेंट अन्य एकाने केली.

 ‘चकदा एक्स्प्रेस’ हा सिनेमा क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या (Jhulan Goswami )आयुष्यावर बेतलेला आहे. यात अनुष्का शर्मा झुलनची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. 2002 साली झुलन गोस्वामीचं भारतीय संघात पदार्पण झालं  आणि एक उत्तम ऑलराउंडर म्हणून तिचा उदय झाला. ती उत्तम बॉलर तर होतीच पण तिची बॅटही झकास काम करते. 2007 साली आयसीसीच्या उत्तम खेळाडूंच्या यादीत एकही भारतीय पुरुष क्रिकेटपटू नव्हता, त्यावेळी आसीसी प्लेअर ऑफ द इयर म्हणून गौरवलेली झुलन ही एकमेव क्रिकेटपटू. झुलनचा संघर्ष तिची जिद्दी आणि तिचं सातत्यपूर्ण पॅशन, हे सारं अत्यंत प्रेरणादायी आहे. तिच्या कारकिर्दीनं भारतीय महिला क्रिकेटची पायाभरणीच केली आहे. 600 बळी घेण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

झुलनची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारण्यासाठी अनुष्काने बरीच मेहनत घेतली. क्रिकेटचे बारकावे शिकली. पण आत्तापासूनच तिच्या लुकवर लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशात अनुष्काचा हा सिनेमा प्रेक्षकांना किती आवडेल, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अनुष्काचा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. 

4 वर्षांपूर्वी ‘झीरो’ या चित्रपटात अनुष्का दिसली होती. पण हा चित्रपट दणकून आपटला होता. यानंतर अनुष्का तिच्या संसारात रमली. याचदरम्यान तिने मुलगी वामिकाला जन्म दिला. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्का आता पुन्हा कमबॅक करतेय. मुलीच्या जन्मानंतरचा अनुष्काचा हा पहिला सिनेमा आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माझुलन गोस्वामी