Join us  

Photos: फोटोग्राफर्सला पाहून अनुष्काला आला राग, वामिकाला छातीशी घट्ट कवटाळत लपवला चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 4:11 PM

विराट-अनुष्का वामिकासह विमानतळावर स्पॉट; लोक म्हणाले, फोटोग्राफर्सचा जीव घेणार का?

ठळक मुद्देअनुष्काने गेल्या 11 जानेवारीला वामिकाला जन्म दिला. वामिकाच्या जन्माला आता चार महिने पूर्ण होणार आहेत. पण या चार महिन्यात अद्यापही वामिकाचा चेहरा दिसलेला नाही. 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा  (AnushkaSharma ) नुकतीच मुंबई एअरपोर्टवर दिसली. एकटी नाही तर चिमुकल्या वामिकासोबत (Vamika). पती विराट कोहली (Virat Kohli) सुद्धा तिच्यासोबत होता. या तिघांचे एअरपोर्टवरचे फोटो क्षणात व्हायरल झाले. शिवाय या फोटोंची एका खास कारणाने चर्चाही रंगली. होय, अनुष्का व विराटसोबत वामिका आहे म्हटल्यावर एअरपोर्टवर फोटोग्राफर्सचे कॅमेरे पुढे सरसावले.  (Anushka Sharma daughterVamika and husband Virat Kohli at mumbai airport)

वामिकाची एक झलक कॅमे-यात कैद व्हावी, यासाठी फोटोग्राफर्सचा आटापीटा सुरु झाला. फोटोग्राफर्सला पाहून अनुष्का लगेच सावध झाली. तिने चिमुकल्या वामिकाला छातीशी घट्ट कवटाळले. शिवाय फोटोग्राफर्सवर रागाने इतका जळजळीत कटाक्ष टाकला की, रागात पाहतांनाचे तिचे फोटो लगेच चर्चेत आलेत. इतकेच नाही, यामुळे अनुष्का ट्रोलही झाली.

सध्या विराट कोहली आयपीएल मॅचमध्ये बिझी आहे. विराट जिथे जाईल तिथे अनुष्का व वामिका त्याच्यासोबत असतात/ पुढचे आयपीएलचे काही सामने मुंबईत असल्याने विराट, अनुष्का मुंबईत परतले आहेत.

  लोक म्हणाले, फोटोग्राफर्सचा जीव घेणार का?अनुष्का व विराटने वामिकाला मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वामिकाचा चेहरा कोणालाही दिसू नये, यासाठी अनुष्का सतत सावध असते. एअरपोर्टवरही अनुष्का अशीच सावध दिसली. तिने वामिकाचा चेहरा दिसू नये म्हणून तिला छातीशी घट्ट कवटाळले.पण यामुळे अनुष्का ट्रोलही झाली. मुलीचा चेहरा आणखी किती लपवणार? फोटोग्राफर्सचा जीव घेणार का? अशा आशयाच्या कमेंट्स अनेक युजर्सनी केल्यात.

अनुष्काने गेल्या 11 जानेवारीला वामिकाला जन्म दिला. वामिकाच्या जन्माला आता चार महिने पूर्ण होणार आहेत. पण या चार महिन्यात अद्यापही वामिकाचा चेहरा दिसलेला नाही. अनुष्का व विराटने लेकीचे फोटो शेअर केलेत. पण हे फोटो शेअर करताना वामिकाचा चेहरा दिसणार नाही, याची त्यांनी पूरेपूर काळजी घेतली. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली