Join us  

लग्नानंतर काम करणार नाही...!  कामावर परतलेल्या अनुष्का शर्माचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 12:24 PM

अनुष्का शर्माने (Anushka Sharma) जानेवारी महिन्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यानंतर दोन महिने विश्रांती घेतल्यानंतर तिने शूटींगला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देचर्चा खरी मानाल तर अनुष्काने महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे बायोपिक साईन केले आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यावर्षी 11 जानेवारीला आई झाली आणि लेक वामिकाच्या जन्मानंतर तीन महिन्यांनी कामावर परतली. काल सेटवरचे तिचे फोटो बघता बघता इंटरनेटवर व्हायरल झालेत. पाठोपाठ अनुष्काचा एक जुना व्हिडीओही व्हायरल झाला.होय, लग्नानंतर मी अजिबात काम करणार नाही, असे अनुष्का या जुन्या व्हिडीओत म्हणतेय. हा व्हिडीओ सिमी ग्रेवाल यांच्या ‘Simi Garewal Selects India's Most Desirable’या लोकप्रिय शोचा आहे. यात अनुष्का तिच्या लग्नाचा प्लान व मुलांबद्दल बोलताना दिसतेय.

या व्हिडीओत ती म्हणते, ‘मला लग्न करायचे आहे. मला मुलंही हवी आहे. लग्नानंतर कदाचित मी काम करणार नाही.’

निश्चितपणे अनुष्काचा हा व्हिडीओ जुना आहे. काळासोबत विचार बदलतात, भूमिका आणि संदर्भही बदलतात. त्यानुसार, अनुष्का लग्नानंतर काम करतेय आणि मुलीच्या जन्मानंतरही ती कामावर परतली आहे.  खरे तर अनुष्का आणखी 2 महिन्यांनंतर कामावर परतणार होती. मे महिन्यात कामावर परण्याचा निर्णय तिने घेतला होता. पण आता दोन महिन्याआधीच, म्हणजे शेड्यूलच्याआधीच अनुष्का कामावर परतली आहे.  

अनुष्का एका जाहिरातीच्या शूटसाठी काल सेटवर आली होती. दोन दिवस ती या जाहिरातीचे शूट पूर्ण करणार आहे. यानंतर ती चित्रपटाचे शूटींग सुरु करेल, असेही मानले जातेय.  

COOL : करिनापाठोपाठ अनुष्का शर्माही कामावर परतली, दोन महिने आधीच सुरू केले शूटींग

सेटवरच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, अनुष्का आईची जबाबदारी सांभाळण्यासोबतच काम व पर्सनल लाईफही बॅलेन्स करू शकते. वेळेची पक्की म्हणून ती इंडस्ट्रीत ओळखली जाते. अगदी वेळेच्या आधीच ती सेटवर पोहोचलेली असते.  वर्कफ्रंटबद्दल बोलाल तर, शाहरूखसोबतचा ‘झिरो’ हा अनुष्काचा अलीकडचा अखेरचा सिनेमा होता. या सिनेमानंतर अनुष्काने अद्याप नव्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. चर्चा खरी मानाल तर अनुष्काने महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे बायोपिक साईन केले आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

टॅग्स :अनुष्का शर्मा