अनुष्काचे अॅनिमल लव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 15:59 IST
बॉलिवुड कलाकारांचे अॅनिमल लव तर आपण नेहमीच पाहतो. परंतू काही कलाकार प्राण्यांची किती ...
अनुष्काचे अॅनिमल लव
बॉलिवुड कलाकारांचे अॅनिमल लव तर आपण नेहमीच पाहतो. परंतू काही कलाकार प्राण्यांची किती केअर करतात त्यांना जिवापाड जपतात हे आपल्याला माहित नसते. अशीच आपली चुलबुली गर्ल अनुष्का शर्माचे प्राण्यांविषयी प्रेम पहायला मिळत आहे. अनुष्का तिच्या सर्व चाहत्यांना सध्या सांगत आहे, तुम्ही होळी खेळा पण कोणतेही रंग प्राण्यांवर उधळु नका. प्राण्यांना होळीच्या रंगांपासुन दुर ठेवा. अशी प्रामाणिक रिक्वेस्ट ती सोशल साईट्सच्या माध्यामातून सर्वांना करीत आहे.