अनुराग कश्यपच्या मुलीला लागले बॉलिवूडचे वेध; पहिली डाक्युमेंट्री केली रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 19:45 IST
Anurag Kashyap's daughter makes film on girls' education ; अनुराग कश्यप याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आलिया कश्यपने तयार केलेल्या डाक्युमेंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘लेट गर्ल लर्न’ नावाच्या या माहितीपटामधून भारतातील मुलींच्या शिक्षणावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
अनुराग कश्यपच्या मुलीला लागले बॉलिवूडचे वेध; पहिली डाक्युमेंट्री केली रिलीज
चित्रपट निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यप याने आतापर्यंत डार्क, गुढ चित्रपटांची निर्मिती केली आहे. मात्र आपल्या चित्रपटातून तो नेहमीच संदेश देण्याचा प्रयत्न करीत आला आहे. आता त्याची ही परंपरा त्याची मुलगी आलिया कश्यप पुढे चालविणार असल्याची दिसते. आलियाने ‘मुलींचे शिक्षण’ या विषयावर एक डाक्युमेंट्री तयार केली असून, हा व्हिडीओ यू-ट्यूबवर ट्रेन्ड होतो आहे. अनुराग कश्यप याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आलिया कश्यपने तयार केलेल्या डाक्युमेंट्रीचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘लेट गर्ल लर्न’ नावाच्या या माहितीपटामधून भारतातील मुलींच्या शिक्षणावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मुलींविषयीची आकडेवारी मांडली आहे. सोबतच विविध संदर्भ दिले आहेत. यात मुलीच्या मुलाखती घेतल्या असून, या मुलाखती घेण्यासाठी मोबाईलचा वापर केला असल्याचे दिसते. या माहितीपटामधून शिक्षणाबद्दल महिलांचे मत जाणून घेण्यात आले आहे. हा चित्रपट एका शाळेवर आधारित असल्याचे दिसते. चित्रपटाच्या शेवटी डायरेक्टेड बाय आलिया कश्यप असे नावही तिने दिले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लवकरच आलिया चित्रपट निर्मिती क्षेत्रात येण्यास उत्सुक असल्याचे दिसते. आलिया ही अनुराग कश्पची पहिली पत्नी आरती बजाज हिची मुलगी आहे. आलिया आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असा अंदाज वर्तविला जात आहे. अनुराग कश्यप याने दिग्दर्शित केलेले मागील काही चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरले नाहीत. यामुळे निराश झालेल्या अनुरागने आपला जेनर बदलविण्याची तयारी केली आहे असे सांगण्यात येते. अनुराग कश्यप लवकरच रोमाँटिक ड्रामा दिग्दर्शित करणार असून, यात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसेल असे सांगण्यात येते.