Join us  

अनुराग कश्यपने इतक्या वर्षांनंतर केला धक्कादायक खुलासा; अभय देओलसोबतच्या माझ्या आठवणी फार वाईट! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 10:29 AM

अभयने आपल्या अ‍ॅक्टिंगच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचाराल तर अभयसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव फार चांगला नाही.

ठळक मुद्दे२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती.

अभय देओलच्या अ‍ॅक्टिंगबद्दल शंका घेण्याचे तसे कारण नाही. अभयने आपल्या अ‍ॅक्टिंगच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण दिग्दर्शक अनुराग कश्यपला विचाराल तर अभयसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव फार चांगला नाही.अभयने अनुरागसोबत ‘देव डी’मध्ये काम केले होते. 2009 साली रिलीज झालेला ‘देव डी’ हा अभय व अनुराग यांचा एकमेव सिनेमा आहे. ‘देव डी’ हा ‘देवदास’चे मॉडर्न व्हर्जन होता. हा सिनेमा चांगलाच गाजला होता. पण या सिनेमात अभयसोबत काम करण्याचा माझा अनुभव अतिशय वाईट होता, असा खुलासा इतक्या वर्षांनंतर अनुरागने केला आहे.

एका मुलाखतीत अनुराग यावर बोलला़ त्याने सांगितले, ‘अभयसोबत काम करतानाच्या माझ्या आठवणी फार वाईट आहे. या सिनेमानंतर मी कधीच त्याच्यासोबत फार बोललो नाही. शूटींगदरम्यान अभय प्रचंड गोंधळलेला राहायचा. तो फाईव्ह स्टार हॉटेलात थांबायचा आणि चित्रपटाचा बजेट अतिशय तुटपूंजा असल्याने आम्ही सगळे पहाडगंजमध्ये थांबलो होता. चित्रपटाच्या प्रमोशनवेळीही त्याच्या नख-यांनी आम्ही सगळे वैतागलो होतो. जेव्हा गरज असायची तो नेमका गायब असायचा. त्याने ‘देव डी’चे प्रमोशन केले नाही. चित्रपट आणि क्रू मेंबर्सचाही त्याने अपमान केला.  कदाचित त्यावेळी तो भावनात्मक आणि वैयक्तिक समस्यांमधून जात असावा. मी त्याला धोका दिला, असे त्याला वाटते. त्यानंतर त्याने कधीच माझ्याशी संपर्क ठेवला नाही. पण माझ्या मते, त्याचा या स्वभावामुळे अनेक दिग्दर्शक निर्माते त्याच्यापासून दुरावले. तो एक उत्तम कलाकार आहे़ त्याला आर्टिस्टिक चित्रपट करायचे होते आणि सोबत  मेनस्ट्रिम बेनिफिट्सही हवे होते.’

माझ्याकडे सेलिब्रेट करण्यासारखे काहीही नाहीअभिनयाची उत्तम जाण असूनही अभयकडे फार कुणाचे लक्षच गेले नाही. असे का? असा प्रश्न एका मुलाखतीत अभयला विचारण्यात आला होता. यावर त्याने धक्कादायक उत्तर दिले होते. मिड डेला दिलेल्या  मुलाखतीत अभय देओलने अनेक खुलासे केले होते. यापैकीच एक म्हणजे, काम न मिळण्याचा. ‘मला कुणीच काम देत नाही. मी ज्याप्रकारचे सिनेमे केलेत, तसे चित्रपट सध्या कुणीही बनवत नाही. खरे तर मी स्वत:ला कुठल्याही एका चौकटीत बांधून ठेवलेले नाही. एखादी गोष्ट मला आवडली तर मी ती करतो. चित्रपटांबद्दल माझी स्वत:ची एक आवड आहे. मला ज्याप्रकारच्या कथा आवडतात, त्या बहुतेक नव्या दिग्दर्शकाच्या असतात. मला आजपर्यंत ना कुठला पुरस्कार मिळाला, ना कुठला लँडमार्क प्रोजेक्ट. त्यामुळे सेलिब्रेट करण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. तुम्ही मेनस्ट्रिम इंडस्ट्रीच्या विरूद्ध जात असाल तर तुम्हाला मनासारखे काम मिळत नाही,’ असे अभयने यावेळी सांगितले होते.

२००५ मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभयने डेब्यू केला होता. या रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपटात अभयच्या अपोझिट आयशा टाकिया होती. यातील अभयचा अभिनय लोकांना आवडला होता. यानंतर आहिस्ता-आहिस्ता, हनीमून ट्रॅव्हल्स प्राय.लिमिटेड, एक चालीस की लास्ट लोकल, देव डी, आयशा, जिंदगी ना मिलेगी दोबारा, शंघाई, हॅपी फिर भाग जाएगी, नानू की जानू अशा अनेक चित्रपटांत त्याने काम केले. अभय हा धर्मेन्द्र यांचा भाऊ अजीत देओल यांचा मुलगा आहे.

टॅग्स :अभय देओलअनुराग कश्यप