Join us

मेरा कुछ सामान... या गाण्यात झळकलेली अभिनेत्री आता करते हे काम, या अभिनेत्याची आहे पत्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:13 IST

अभिनेत्री अनुराधा पटेल यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. त्या रेखा यांच्यासोबत मन क्यों बहका रे बहका या गाण्यात दिसल्या होत्या.

ठळक मुद्देअनुराधा यांनी सदा सुहागन, धर्म अधिकारी, रुखसत यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी काही मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे.

अभिनेत्री अनुराधा पटेल यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे. अनुराधा या गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न केले असून त्या संसारात प्रचंड खूश आहेत.

अनुराधा पटेल या प्रसिद्ध अभिनेते अशोक कुमार यांच्या नात आहेत. त्यांनी लव्ह इन गोवा या चित्रपटाद्वारे त्यांच्या चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. या चित्रपटानंतर त्यांना लगेचच उत्सव या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात रेखा यांच्यासोबत त्या महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. रेखा यांच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. मन क्यों बहका रे बहका या गाण्यात आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्यांनी रेखा यांच्यासोबत एक हिट चित्रपट दिला होता. रेखा आणि नसिरुद्दीन शहा यांची मुख्य भूमिका असलेल्या इजाजत या चित्रपटात अनुराधा पटेल देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है हे प्रसिद्ध गाणं त्यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

अनुराधा यांनी सदा सुहागन, धर्म अधिकारी, रुखसत यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी काही मालिका आणि जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. त्या २०१३ मध्ये रब्बा मैं क्या करू या चित्रपटात दिसल्या होत्या. त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. मुंबईत पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची त्यांची इन्स्टिट्यूट आहे. त्यांनी प्रसिद्ध अभिनेता कंवलजीत सिंह यांच्यासोबत लग्न केले असून त्यांना तीन मुलं आहेत. अनुराधा आणि कवलजीत अनेकवेळा सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतात.

टॅग्स :बॉलिवूड