Join us  

'हम आपके है कौन'च्या चित्रीकरणाच्यावेळी एका कलाकाराला सामोरे जावे लागले होते गंभीर आजाराला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2019 7:24 PM

हम आपके है कौन या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते.

ठळक मुद्देअनुपम खेर यांच्या चेहऱ्याला लकवा आला असल्याने त्यांचे तोंड काही काळासाठी वाकडे झाले होते. पण त्यांनी त्यावर उपचार केले आणि या गंभीर आजारावर मात केली.

हम आपके है कौन या चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाली असली तर या चित्रपटाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाहीये. या चित्रपटातील प्रेम, निशा, पूजा या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलेच कलेक्शन केले होते. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांचे अभिनय, या चित्रपटाची कथा, या चित्रपटाची गाणी सगळेच काही प्रेक्षकांना भावले होते. या चित्रपटाने त्यावेळी अनेक पुरस्कार मिळवले होते. सगळ्या कुटुंबांनी एकत्र पाहायला चित्रपट अशी या चित्रपटाची त्याकाळात ओळख निर्माण झाली होती. 

हम आपके है कौन या चित्रपटात प्रोफेसर सिद्धार्थ चौधरी ही व्यक्तिरेखा अनुपम खेर यांनी साकारली होती. निशा आणि पूजा म्हणजेच माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे यांच्या वडिलांच्या भूमिकेत आपल्याला अनुपम खेर यांना पाहायला मिळाले होते. त्यांच्या पत्नीची भूमिका रिमा लागू यांनी साकारली होती. या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते. 

या चित्रपटात एका प्रसंगात त्यांनी शोलेमधील वीरूचे टाकीवरील दृश्य खूपच छान प्रकारे त्यांच्या अंदाजात सादर केले होते. यावेळी अनुपम खेर आपले तोंड वाकडे करून संवाद बोलताना आपल्याला दिसले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, अनुपम या दृश्यात तोंड वाकडे झाल्याचा अभिनय करत नव्हते तर एका आजारामुळे काही काळासाठी त्यांचा चेहरा वाकडा झाला होता. 

अनुपम खेर यांच्या चेहऱ्याला लकवा आला असल्याने त्यांचे तोंड काही काळासाठी वाकडे झाले होते. पण त्यांनी त्यावर उपचार केले आणि या गंभीर आजारावर मात केली. हे घडल्यानंतर या चित्रपटात त्यांच्यावर क्लोज अप दृश्य खूपच कमी प्रमाणात चित्रीत करण्यात आली होती. हा चित्रपट पाहाताना अनुपम खेर यांना काही झाले आहे याची पुसटशी देखील कल्पना देखील प्रेक्षकांना आली नव्हती. अनुपम यांनी देखील त्याकाळात याबाबत काहीही न बोलणे पसंत केले होते. त्यांनीच ही गोष्ट अनेक वर्षांनंतर एका मुलाखतीत सांगितली होती. 

टॅग्स :अनुपम खेरहम आपके हैं कौन