Join us  

तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? नसीरूद्दीन शहांना अनुपम खेर यांचा बोचरा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 12:38 PM

समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे.

ठळक मुद्दे काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिका-याची हत्या केली होती. त्या घटनेवर नसीरूद्दीन शहा यांनी भाष्य केले होते.

समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे.देशात इतके स्वातंत्र्य आहे की, इथे लष्करावर दगड भिरकावले जाऊ शकतात. हवाईदल प्रमुखाला शिव्याशाप दिल्या जाऊ शकतात. तुम्हाला एका देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे? असे अनुपम खेर नसीरूद्दीन शहा यांना उद्देशून म्हणाले. तुम्हाला काहीही वाटू शकते. याचा अर्थ ते सगळे काही सत्य आहे, असा होत नाही, असेही अनुपम म्हणाले.

 काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिका-याची हत्या केली होती. त्या घटनेवर नसीरूद्दीन शहा यांनी भाष्य केले होते. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती.  देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते. सध्या देशात गाईचा जीव माणसापेक्षा जास्त मौल्यवान झाला आहे. गाईचे प्राण पोलीस अधिकाºयापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरले आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरले आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल , अशा शब्दांमध्ये त्यांनी देशातील परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. कायदा अगदी बिनधास्तपणे हातात घ्यावा, यासाठी लोकांना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे. याची मला अतिशय चीड येते. देशातील परिस्थिती चिंताजनक आहे. लोकांनादेखील याबद्दल संताप वाटला पाहिजे. हे आमचे घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो, असा विचार लोकांच्या मनात यायला हवा, असेही शहा म्हणाले होते.

टॅग्स :अनुपम खेरनसिरुद्दीन शाह